मोठी बातमी : मुंबईतील भोंगळ कारभार उघडकीस, 45 जणांच्या जीवाशी खेळ

मोठी बातमी : मुंबईतील भोंगळ कारभार उघडकीस, 45 जणांच्या जीवाशी खेळ

मुंबईच्या टीबी हॉस्पिटलमधील भोंगळ कारभार उघडकीस आला आहे.

  • Share this:

मुंबई, 19 एप्रिल : एकीकडे राज्यातील आणि त्यातही राजधानी मुंबईतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. मात्र अशा स्थितीतच मुंबईच्या टीबी हॉस्पिटलमधील भोंगळ कारभार उघडकीस आला आहे. टीबी रुग्णालयाने कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या 45 कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्येच क्वारन्टाइन‌ केलं नसल्याची माहिती समोर आली आहे.

कोरोना पॉझिटिव्ह कर्मचाऱ्याच्या संपर्कात आलेल्या 45 कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्येच क्वारन्टाइन‌ न केल्यामुळे या सर्वांना आपल्या घरी जावं लागलं. त्यामुळे घरी गेलेल्या कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना संक्रमण होण्याची भीती वाटत आहे. कर्मचाऱ्यांना हॉस्पिटलमध्येच क्वारेनटाईन‌ करण्याचे सांगितले असतानाही हॉस्पिटल प्रशासनाने व्यवस्था केली नसल्याचा प्रकार घडला आहे.

हेही वाचा- आमदार रवी राणांना रुग्णालयात केलं दाखल, नवनीत राणांचेही थ्रोट स्वॅब तपासणीला

दोन दिवस वाट बघून अखेर 45 कर्मचारी घरी परतले. दहा बाय दहाच्या घरात कसे क्वारन्टाइन होणार, असा कर्मचाऱ्यांना प्रश्न पडला आहे. कोरोना चाचणीचे परिमाण बदलल्यामुळे एकाही कर्मचाऱ्याची चाचणी झालेली नाही. पाच दिवस वाट बघा, लक्षणे आढळली तरच तपासणीसाठी या, असे कस्तुरबा रुग्णालयाने सांगितलं असल्याची माहिती कर्मचाऱ्यांनी दिली.

पालिका आणि राज्य सरकारमधील आकडेवारीत भिन्नता

एकीकडे मुंबईतील रुग्णालयाचा गलथानपणा समोर आला आहे, तर दुसरीकडे काल पालिका आणि राज्य सरकारमधील आकडेवारीतील भिन्नता समोर आली होती. मुंबईत कोरोनोाचे 87 नवे रुग्ण असल्याची माहिती मुंबई महापालिकेकडून देण्यात आली. मात्र राज्य सरकारच्या आकडेवारीनुसार मुंबईत 184 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे रुग्णसंख्या मुंबई महापालिकेने कमी दाखवली की राज्यसरकारने जास्त दाखवली? असा प्रश्न निर्माण झाला.

संपादन - अक्षय शितोळे

First published: April 19, 2020, 11:48 AM IST

ताज्या बातम्या