पत्नीशी होते अनैतिक संबंध, मित्राच्या मदतीने पतीने काढला तरुणाचा काटा!

पत्नीशी होते अनैतिक संबंध, मित्राच्या मदतीने पतीने काढला तरुणाचा काटा!

कल्याण इथं अनैतिक संबंधातून खून करून फेकून देण्यात आलेल्या मृतदेहाचा सांगाडा भिवंडी तालुक्यात फेकून देण्यात आला होता.

  • Share this:

रवी शिंदे, प्रतिनिधी

भिवंडी, 10 डिसेंबर :  भिवंडी तालुक्यात मुंबई महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रालगतच्या झुडूपात सापडलेल्या मृतदेहाच्या सांगडा प्रकरणाचं अखेर गुढ उकललं आहे. कल्याणमध्ये अनैतिक संबंधातून एका तरुणाची हत्या करण्यात आली होती आणि मृतदेह हा भिवंडीत फेकून देण्यात आला होता. महिलेच्या पतीने आपल्या दोन मित्रांच्या मदतीने खून केल्याचं उघड झालं आहे.

राजीव ओमप्रकाश बीडलान ( २५ रा. बेतुरकरपाडा ,कल्याण ) असं हत्या झालेल्या तरुणाचे नाव आहे. तो २१ ऑक्टोबर रोजी घरातून बेपत्ता झाल्याने त्याच्या हरवल्याची नोंद २३ ऑक्टोबर रोजी कल्याणच्या महात्मा फुले पोलीस ठाण्यात करण्यात आली होती.

आज सकाळी एक मृतदेहाचा सांगाडा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वाळसिंद येथील मुंबई महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रालगतच्या झुडूपात सापडला होता.

या प्रकरणाचा तपास सुरू असताना तपास अधिकारी पोलीस हवालदार धनंजय सोनावले यांनी गुप्त खबऱ्यामार्फत माहिती काढली असता राजीव बीडलानचा खून करून मृतदेह भिवंडीत फेकून दिल्याची माहिती मिळाली.

त्यानुसार, आज सकाळी मृतदेहाचा सांगाडा ताब्यात घेऊन पुढील वैद्यकीय तपासणीसाठी स्व. इंदिरा गांधी उपजिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आला.

पोलीस सूत्रांनुसार, मृत राजीव बीडलान हा अॅम्ब्युलन्स चालक म्हणून काम करीत असताना त्याचे एका महिलेशी अनैतिक संबंध होते. त्या रागातून या महिलेच्या पतीने अन्य तीन मित्रांच्या मदतीने राजीव याची हत्या करून मृतदेह भिवंडीतील वाळसिंद येथील मुंबई महापालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रालगतच्या झुडूपात फेकून दिल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

रात्री उशिरापर्यंत या खुनातील चारही आरोपींना महात्मा फुले पोलिसांकडून अटक करण्याची प्रक्रिया सुरू असल्याने त्यांची नांवे समजू शकली नाहीत. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: Bhiwandi
First Published: Dec 10, 2019 11:18 PM IST

ताज्या बातम्या