Home /News /mumbai /

कोरोनात मुख्याध्यापकाने समोर ठेवला आदर्श; 1000 विद्यार्थ्यांची वर्षभराची फी माफ, पत्नीचे दागिने विकून चालवतायेत शाळा

कोरोनात मुख्याध्यापकाने समोर ठेवला आदर्श; 1000 विद्यार्थ्यांची वर्षभराची फी माफ, पत्नीचे दागिने विकून चालवतायेत शाळा

ज्या विद्यार्थ्यांनी फी भरली नाही त्यांना सध्या अनेक शाळा डिफॉल्ट लिस्टमध्ये टाकत आहेत. येथे तर या मुख्याध्यापकाने गरजू विद्यार्थ्यांची एक वर्षांची फी माफ केली.

    मुंबई, 8 जुलै : एकीकडे खासगी शाळांमध्ये कोरोना काळात विद्यार्थ्यांना एक रुपयेदेखील सूट दिली जात नाही, तर दुसरीकडे होली स्टार इंग्रजी शाळेच्या तरुण मालकांनी 65 टक्के विद्यार्थ्यांना संपूर्ण वर्षभराची फी माफ (Year round fee waiver for 1000 students) केली आहे. 35 वर्षीय हुसैन शेख मालाड-मालवणी भागातील होली स्टार इंग्रजी माध्यमाच्या शाळेचे मुख्याध्यापक आणि मालक आहेत. एक वर्षाची फी माफ कोरोमा (Coronavirus) महासाथीत सर्वसामान्यांना आर्थिक संकटाचा सामना करावा लागत आहे. त्यात हुसैन यांनी आपल्या 1500 विद्यार्थ्यांपैकी 1000 विद्यार्थ्यांना वर्षभरासाठी शाळेची फी माफ केली आहे. याशिवाय उरलेले 500 विद्यार्थी फी भरू शकतात. त्यांना फीमध्ये कमीत कमी 15 ते 50 टक्क्यांपर्यंत सूट देण्यात आली आहे. सोबतच गरजू विद्यार्थ्यांच्या पालकांना शाळेत बोलावून त्यांने रेशन किटदेखील दिलं जात आहे. लोकांकडून मागितली मदत इतकच नाही तर आपल्या गरीब विद्यार्थ्यांचं शिक्षण पुढेही सुरू राहावं यासाठी शाळेच्या बाहेर सपोर्ट फॉर स्टुडंट असा एक डोनेशन बॉक्सही लावण्यात आला आहे. या माध्यमातून गरजू विद्यार्थ्यांसाठी पैसे जमा करण्याचा प्रयत्न केला जात आहे. विद्यार्थ्यांकडून फी घेतली नसल्यामुळे शाळेतील शिक्षिकांना पगार देणे आणि स्वत:चं घर चालविण्यासाठी बायकोचं दागिने बँकेत गहाण (schools run by selling wifes jewelery) ठेवले आहेत. हे ही वाचा-Success Story: लोणार ते लंडन! गावाकडच्या मुलाला प्रतिष्ठित Chevening शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करता शिक्षकदेखील अर्ध्या पगारात काम करण्यास तयार झाले आहेत. हुसैन एनजीओच्या मदतीने गेल्या एक वर्षांपासून ते गरजू विद्यार्थी आणि आसपासच्या गरीब लोकांसाठी रेशन किट पोहोचवित आहेत. शाळेतील तब्बल 1000 मुलांच्या पालकांनी विद्यार्थ्यांना शाळेत न पाठविण्याचं कारण हुसैन यांना कळालं तर त्यांना वाईट वाटलं. फीच्या कारणामुळे मुलांचं शिक्षण अर्धवट राहू नये यासाठी हुसैन यांनी शिक्षकांशी चर्चा केली व गरजू विद्यार्थ्यांची वर्षभराची फी माफ करण्याचा निर्णय घेतला. मात्र हे इतकं सोपं नव्हतं. हुसैन यांनी कुुटुंबासाठी जमा केलेले 8 लाख रुपये लोकांच्या घरी रेशन पोहोचविण्यात खर्च केले. या पैशातून ते गेल्या वर्षीच जन्मलेल्या आपल्या मुलीसाठी फिक्स्ड डिपॉजित करू इच्छित होते. मात्र त्यांनी इतर मुलांचाही विचार केला. त्यांनंतर बायकोशी चर्चा करून तिचे दागिने गहाण ठेवले व त्यातून आलेल्या पैशातून शाळा चालवित आहे. कोरोना संपल्यानंतर परिस्थिती सुधारेल असा त्यांना विश्वास आहे. तेव्हा मुलीचे दागिनेही सोडवून आणेन असं हुसैन म्हणाले.

    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Coronavirus, School, Wife

    पुढील बातम्या