मुंबई, 11 मार्च : रागावर नियंत्रण मिळवता न आल्याने त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. मुंबईतील (Mumbai) चेंबूर परिसरात एक अशीच हत्य़ेची घटना समोर आली आहे. 51 वर्षांच्या व्यक्तीने आपल्या पत्नीचा खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत चेंबूरच्या RCF पोलिसांनी अधिक माहिती दिली.
रविवारी रात्री चेंबूरमधील म्हाडा कॉलनीत ही घटना घडली आहे. रविवारी जेम्स जॉन करय्या खूप दारू पिऊन घरी आला होता. घरी आल्यावर त्याने आपल्या पत्नीकड़े राबिया जेम्स करय्याकड़े तिचा मोबाइल मागितला. यावर राबियाने आपला मोबाइल देण्यास नकार दिला. यामुळे जेम्स प्रचंड चिडला. राबिया आपल्याला नाही म्हणाली कशी? हा राग त्याच्या डोक्यात होता. यावरुन जेम्स व राबियामध्ये मोठा वाद सुरू झाला. इतका की त्याने राबियाला शिवीगाळ करायला सुरुवात केली. तो इतक्यावरच थांबला नाही. जेम्स स्वयंपाकघरात गेला व तेथील चाकू घेऊन राबियावर सपासप वार केले. राबिया जमिनीवर कोसळली व त्याचक्षणी तिचा मृत्य़ू झाल्याचं पोलिसांनी सांगितलं. राबियाला जमिनीवर मृत अवस्थेत बघून जेम्स घाबरला. जेम्स पळून जाण्याचा प्रयत्न करीत असताना घरातील काहींनी व शेजारच्यांनी त्याला पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी जेम्सवर भारतीय दंड विधान (IPC) कलम 302 अन्वये खून केल्याचा गुन्हा नोंदविला आहे. राबिया ही जेम्सची दुसरी बायको होती त्याची पहिली बायको मानखुर्दमध्ये राहत असल्याचं पोलिसांनी सांगितलं.
हे वाचा - अमरावतीत रक्तरंजीत होळी, भरदिवसा चाकूने सपासप वार करून तरुणाची हत्या
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.