मुंबई, 21 मार्च : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग ( parambir singh letter) यांच्या पत्रामुळे खळबळ उडाली आहे. त्यांनी आपल्या पत्रात एकीकडे हुक्का पार्लर (hukka parlour) आणि बियर बार (Beer Bar) बाबत गंभीर आरोप केलेले असताना दुसरीकडे टिळक नगर पोलीस स्टेशनच्या (Tilaknagar Police Station) समोरच कॅफे रेस्टारंटमध्ये मात्र सर्रास हुक्का पार्लर आणि बार सुरू असल्याचे समोर आले आहे. पोलिसांनी कारवाई करून काही जणांना ताब्यात घेतले आहे.
मुंबईमध्ये कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत असल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. सार्वजनिक ठिकाणी गर्दी करू नये अशी कडक सूचना देण्यात आली आहे. पण, मुंबईतील पब्ज आणि बारमध्ये कोरोना नियम पायदळी तुटवले जात असल्याचे समोर आले आहे. मुंबईतील टिळक नगर पोलीस स्टेशनच्या हाकेच्या अंतरावर असलेल्या एका कॅफे रेस्टारंटमध्ये सर्रासपणे हुक्का पार्लर सुरू असल्याचे समोर आले आहे.
Health tips : कमी रक्तदाबाचा त्रास असेल तर घरीच करा प्रभावी आयुर्वेदिक उपाय
त्याच बरोबर इथे कोरोनाबाबत केलेल्या अर्ध्या ग्राहकांनी मास्क चेहऱ्यावर लावलेले नव्हते. तसंच सामाजिक अंतराच्या नियमांचा फज्जा ही उडवताना ग्राहक आढळून आले आहेत. पालिकेच्या एन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कॅफे, रेस्टोरंटमध्ये कोविडच्या नियमांचे पालन होत नसल्याची तक्रार मिळाली होती.
या अनुषंगाने शनिवारी रात्री एन विभागाच्या अधिकाऱ्यांनी या ठिकाणी छापा टाकला असता इथे कॅफे, रेस्टांरंटच्या नावाखाली बार आणि हुक्का पार्लर सुरू असल्याचे समोर आले. त्यांनी याची माहिती टिळक नगर पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी कॅफेमध्ये कारवाई केली. पोलिसांनी या प्रकरणी काही जणांना ताब्यात घेतले असून पुढील कारवाई करीत आहेत.
IND vs ENG : विराट-रोहितची जोडी करून देते सचिन-सेहवागची आठवण!
पण, हाकेच्या अंतरावर असलेल्या कॅफेमध्ये इतक्या दिवस हुक्का पार्लर सुरू होते, याची माहिती टिळकनगर पोलिसांना नव्हती का, असा सवाल या निमित्ताने उपस्थितीत झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.