राज्यात उच्चांकी COVID रुग्णांनी केली कोरोनावर मात, एकूण संख्या गेली 14 लाखांच्या वर
राज्यात उच्चांकी COVID रुग्णांनी केली कोरोनावर मात, एकूण संख्या गेली 14 लाखांच्या वर
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. पुण्यातही रुग्ण संख्येचा आलेख वाढत असून एकूण संख्या ही दीड लाखांच्या जवळ गेली आहे.
राज्याचा रिकव्हरी रेट हा 87.51 टक्के एवढा आहे. गेल्या २४ तासांमध्ये 8,142 नवे रुग्ण सापडले. तर 180 COVID-19 रुग्णांचा मृत्यू झाला.
मुंबई 21 ऑक्टोबर: राज्यात कोरोना रुग्णांचा आलेख घसरणीला लागला असून त्यात सलग काही दिवस घट आहे. बुधवारी दिवसभरात उच्चांकी 23,371 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे कोरोनामुक्त होणाऱ्यांची एकूण संख्या ही 14,15,679 एवढी झाली आहे. राज्याचा रिकव्हरी रेट हा 87.51 टक्के एवढा आहे. गेल्या २४ तासांमध्ये 8,142 नवे रुग्ण सापडले. तर 180 COVID-19 रुग्णांचा मृत्यू झाला. मृत्यू दर 2.64 एवढा झाला आहे.
एकूण घेतलेल्या 83,27,493 चाचण्यांपैकी 16,17,658 चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. म्हणजे हे प्रमाण 19.43 टक्के एवढं आहे.
पुण्यात कोरोना रुग्णांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली घट कायम असून बुधवारी शहरातल्या Active रुग्णांची संख्या ही 8 हजारांवर आली आहे.
बुधवारी दिवसभरात 428 पॉझिटिव्ह रुग्णांची वाढ झाली. तर दिवसभरात 758 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. गेल्या काही दिवसांपासून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या ही जास्त आहे. पुण्यात 31 कोरोनाबाधीत रुग्णांचा मृत्यू झाला. यात 8 रूग्ण पुण्याबाहेरचे आहेत.
ऑनलाइन ऑर्डर करण्याआधी ही बातमी वाचा हा Amazon च्या डिलिव्हरी बॉयचा कारनामा
पुण्यात 750 क्रिटिकल रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यात 412 रुग्ण व्हेंटिलेटरवर उपचार घेत आहेत. पुण्यात एकूण पॉझिटिव्ह रूग्णसंख्या ही 1 लाख 58 हजार 387 एवढी झाली आहे. पुण्यातील ॲक्टिव्ह रुग्णांची संख्या ही 8 हजार 248 एवढी झाली आहे.
तर कोरोना रुग्णांच्या मृत्यूचा एकूण आकडा हा 4045 एवढा झाला आहे. आत्तापर्यंत एकूण 1 लाख 46 हजार 094 जणांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी पुण्यात 3 हजार 581 नमुन्यांची (स्वॅब) तपासणी करण्यात आली आहे.
दरम्यान, कोरोना व्हायरस महामारीमुळे (Pandemic) समाजावर आरोग्यविषयक परिणामांव्यतिरिक्त इतरही अनेक परिणाम होत आहेत. जगभर झालेल्या लॉकडाउनमुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक मंदी आली असून त्याचे चटके सर्वच थरांतील लोकांना बसत आहेत. अमेरिकेतही मोठ्या प्रमाणावर बेरोजगारी वाढली असून, त्याचा फटका करिअरच्या मध्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांपेक्षा जेष्ठ कर्मचाऱ्यांना अधिक बसत आहे.
अमेरिकेतील द न्यू स्कूल विद्यापीठाच्या सर्वेक्षणात असं समोर लक्षात आलं आहे. अमेरिकेच्या इतिहासात गेल्या 50 वर्षांत पहिल्यांदाच मध्यमवयीन नागरिकांपेक्षा ज्येष्ठ नोकरदारांना बेरोजगारीचा अधिक प्रमाणात सामना करावा लागत आहे, असं मंगळवारी द न्यू स्कूलने प्रसिद्ध केलेल्या अभ्यासात म्हटलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.