Home /News /mumbai /

बापरे! आणखी 4 महिने पावसाचं संकट राहणार कायम, हवामान तज्ज्ञांनी दिला इशारा

बापरे! आणखी 4 महिने पावसाचं संकट राहणार कायम, हवामान तज्ज्ञांनी दिला इशारा

'महाराष्ट्र सरकारनं भरलेल्या धरणांमधील पाणीसाठा 10 ते 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची व्यक्त केली गरज आहे. तसेच धरणांचं आणि त्यांच्या कार्यक्षमतेचं तातडीनं ऑडिट करण्याची गरज आहे.'

  संदीप भुजबळ, मुंबई 19 ऑक्टोबर: राज्यात आणि देशात धुमाकूळ घालणारा पाऊस शांत होण्याची काही चिन्हे दिसत नाहीत. फक्त भारतातच नाही तर दक्षिण आशियावर आलेलं पावसाचं संकट आणखी किमान 4 महिने कायम राहणार असल्याचा दावा ज्येष्ठ हवामान तज्ज्ञ आणि दक्षिण आशिया कृषीहवामान फोरमचे सदस्य डॉ. रामचंद्र साबळे यांनी केला आहे. साबळे म्हणाले, पुढचे 4 महिने दक्षिण आशियात पाऊस धुमशान घालू शकतो ऑगस्टपासून दक्षिण आशियावर ला निनाचा प्रभाव आहे. ला निना म्हणजे सतत पावसाला पोषक वातावरण होणं. सध्या महाराष्ट्र, तेलंगाणा, आंध्र प्रदेशात पडत असलेला पाऊस त्याचाच परिणाम आहे. पावसामुळे काढणीला आलेल्या खरीपाच्या पिकांचं नुकसान झालं, पिकं आणि माती वाहून गेली. अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणात माती खरडल्यानं शेतीच्या नापिकीचा धोका वाढला आहे. सध्या रब्बीच्या पेरण्या बऱ्याच लांबण्याची पडण्याची भीत आहे. सध्या दक्षिण आशियावर ला निनाच्या प्रभावानं पुढचे 4 महिने सातत्यानं पाऊस पडण्याची भिती आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावरील हवामान संस्था आणि शास्त्रज्ञांशी झालेल्या चर्चेत ही शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. COVID-19: राज्यात गेल्या काही महिन्यातली सर्वात कमी रुग्ण वाढ, मृत्यूही घटले या चर्चेत अमेरिका, युरोप आणि ऑस्ट्रेलियातल्या निवृत्त हवामान शास्त्रज्ञांचा समावेश आहे. अशी माहितीही साबळे यांनी दिली. सध्या महाराष्ट्राच्या भूगर्भात आणि धरणांमध्ये उच्चांकी पाणीसाठी आहे, अशा स्थितीत डोक्यावर सातत्यानं पावसाचं सावट मोठ्या धोक्याला निमंत्रण देऊ शकतं अशी चिंताही व्यक्त केली जातेय. सरकारनं जल आणि धरणतज्ञांसोबत चर्चा करुन तातडीनं धरणातल्या पाणीसाठ्याचं नियोजन करणं गरजेचं असल्याचंही ते म्हणाले. पुणेकरांसाठी Good News,  सलग 15 दिवसांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत घट कायम महाराष्ट्र सरकारनं भरलेल्या धरणांमधील पाणीसाठा 10 ते 15 टक्क्यांपर्यंत कमी करण्याची व्यक्त केली गरज आहे. या अतिपावसाच्या कालखंडात जुन्या धरणांचं आणि त्यांच्या कार्यक्षमतेचं तातडीनं ऑडिट करण्याची गरज आहे. येत्या काही दिवसात पुन्हा जोरदार पाऊस होऊ शकतो. दक्षिण आशियात भारत, अफगाणिस्तान, बांग्लादेश, श्रीलंका, पाकिस्तानमध्ये येणारे 4 महिने अवकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे असंही साबळे यांनी सांगितलं आहे.

  तुमच्या शहरातून (मुंबई)

  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Rain

  पुढील बातम्या