संवाद यात्रेत सरकारचे दलाल, मराठा ठोक मोर्च्याच्या आरोप

राज्यभरात मराठा आंदोलनाच्या नावाखाली संवाद यात्रा सुरू आहे. ही संवाद यात्रा सरकारनेच घडवून आणली आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 28, 2018 06:20 PM IST

संवाद यात्रेत सरकारचे दलाल, मराठा ठोक मोर्च्याच्या आरोप

स्वाती लोखंडे-ढोके, प्रतिनिधी


मुंबई, 28 नोव्हेंबर :   मराठा संवाद यात्रेत सहभागी झालेले कार्यकर्ते हे सरकारचे दलाल असल्याचा गंभीर आरोप मराठा ठोक मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी केला. तसंच सरकारने जर कायद्या टिकणाऱ्या आरक्षणाची घोषणा केली तर अधिवेशनात गनिमी काव्याने  अधिवशेनात घुसू असा इशाराही मराठा क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी दिला.


मुंबईतील आझाद मैदानावर मराठा क्रांती मोर्च्याच्या कार्यकर्त्यांचे बेमुदत उपोषण सुरू आहे. आज दुसऱ्या दिवशी पत्रकार परिषद घेऊन कार्यकर्त्यांनी सरकारवर गंभीर आरोप केले.

Loading...


राज्यभरात मराठा आंदोलनाच्या नावाखाली संवाद यात्रा सुरू आहे.  ही संवाद यात्रा सरकारनेच घडवून आणली आहे. ठोक मोर्च्याचे कार्यकर्ते हे गेले 9 दिवस बेमुदत उपोषणाला बसले असून त्याची सरकारने दखल घेतली नाही आणि संवाद यात्रेच्या नावावर एकत्रित झालेल्या मुठभर लोकांना सरकार लगेच कसं चर्चेला बोलावतं. जर मराठा मोर्चाने असं ठरवलंय की, यापुढे  सरकार बरोबर चर्चा होणार नाही मग संवाद यात्रेतील लोक का सरकार बरोबर चर्चा करत आहे असा सवाल कार्यकर्त्यांनी उपस्थितीत केला.


संवाद यात्रेतील दलाल हे मराठा समाजाचे नुकसान करत आहे. काही लोक आंदोलनाला गालबोट लावण्याचा प्रयत्न करत आहे हे सरकारचे दलाल आहे अशा आरोप कार्यकर्त्यांनी केला.


तसंच अधिवेशनाच्या एक दिवस आधी जर टिकणार आरक्षण सरकारने घोषित केलं नाहीतर गनिमी काव्याने अधिवेशनात घुसणार असा इशारा मराठा ठोक मोर्चाने दिला.


राज समितीच्या 225 समन्वयकांची उद्या आझाद मैदानात बैठक होणार आहे अशी माहितीही कार्यकर्त्यांनी दिली.


दरम्यान, मराठा आरक्षणासंदर्भात मंत्रिमंडळ उपसमितीच्या बैठका सुरूच आहे. आज सकाळी होणारी मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक रात्री 9 वाजता पार पडणार आहे. तसंच एटीआर देखील आजऐवजी उद्याच विधीमंडळात दाखल केलं जाईल. त्यामुळं आरक्षणाच्या विधेयकासंदर्भात सरकार चालढकल करत असल्याचा आरोप विरोधक करत आहेत.


=============================================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2018 06:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...