कोरोनामुळे चिंताग्रस्त झालेल्या मुंबईकरांना सरकारने दिली गुड न्यूज

कोरोनामुळे चिंताग्रस्त झालेल्या मुंबईकरांना सरकारने दिली गुड न्यूज

मुंबईकर चिंताग्रस्त झालेले असतानाच मुंबईतील नागरिकांना एक दिलासा मिळाला आहे.

  • Share this:

मुंबई, 3 जुलै : कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भामुळे मुंबईकर चिंताग्रस्त झालेले असतानाच मुंबईतील नागरिकांना एक दिलासा मिळाला आहे. कारण मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी 50 दशलक्ष क्युबिक लिटर पाणी अप्पर वैतरणा धरणातून सोडण्यात आले असल्याची माहिती जलसंपदा मंत्री जयंत पाटील यांनी मुंबईकरांना दिली आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या मागणीनुसार मुंबईला पाणी पुरविणाऱ्या अप्पर वैतरणा आणि भातसा धरणात पुरेसा पाणीसाठा असल्याने मुंबईत पाण्याची कमतरता भासणार नाही, असा विश्वास जयंत पाटील यांनी व्यक्त केला आहे. मुंबईकरांची तहान भागवण्यासाठी अप्पर वैतरणा धरणातून 50 दशलक्ष क्युबिक लिटर पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे आता मुंबईकरांचे पाण्याबाबतची काळजी दूर झाली आहे.

दरम्यान, मुंबईची लोकसंख्या पाहता मुंबईला मोठ्या प्रमाणात पाणीपुरवठा करावा लागतो. झोपडपट्टी भागात अनेकदा पाणी मिळत नाही किंवा कमी दाबाने पाणी मिळते मात्र वैतरणा धरणातून50 दशलक्ष क्युबिक लिटर पाणी सोडल्याने मुंबईतील नागरिकांना मोठ्या प्रमाणात दिलासा मिळणार आहे.

दरम्यान, जून अखेरीला विश्रांती घेतलेल्या मान्सूनने पुन्हा एकदा जोरदार आगमन केलं आहे. कोकणात शुक्रवारपासूनच मुसळधार पाऊस कोसळत असताना आता महाराष्ट्राच्या 6 जिल्ह्यांमध्ये वेधशाळेने RED ALERT जारी केला आहे.

मुंबईसह, ठाणे, पालघर, रायगड, पुणे आणि नाशिक या 6 जिल्ह्यांमध्ये हवामान खात्याने (IMD)अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. पुणे आणि नाशिक जिल्ह्यांच्या घाटमाथ्यांवर अतिजोरदार पाऊस होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतही जोरदार पावसाची शक्यता आहे. तिथे ऑरेंज अॅलर्ट देण्यात आला आहे.

First published: July 3, 2020, 9:21 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading