मुंबई 11 जून: मान्सून राज्यात पोहोचला असतानाच मुंबईकरांसाठी एक चांगली बातमी आहे. आता मुंबईला पुराचा धोका सांगणारी यंत्रणा शुक्रवारी मुंबईला मिळणार आहे. दर पावसाळ्यात मुंबई पाणी तुंबल्यामुळे काही दिवस ठप्प होते आणि लोकांचे प्रचंड हाल होतात. आता या यंत्रणेमुळे या पावसाळ्यात मुंबईकरांचे हाल कमी होणार आहेत.
ही यंत्रणा 12तास आधीच पुराचा अलर्ट देणार आहे. ही माहिती प्रभागनिहाय मिळणार असून कुठे किती पूर येऊ शकतो याची सूचना आधीच मिळणार आहे. त्यामुळे त्याचा मोठा फायदा होणार आहे.
या यंत्रणेमुळे बाधित होणाऱ्या लोकांचं स्थलांतर करणं आणि त्यांना सुरक्षित स्थळी पोहोचवणं याबाबतचे निर्णय घेण्यासाठी प्रशासनाला मदत होणार आहे. निर्णय घेण्यात मदत होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि केंद्रीय मंत्री हर्षवर्धन यांच्या हस्ते या प्रणालीचं उदघाटन होणार आहे.
ही सूचना आ आधीच मिळाली तर रेल्वे आणि पालिकेच्या यंत्रणाही सतर्क होतील. लोकांनाही त्याबाबतची सूचना मिळेल. त्यामुळे लोक अडकणार नाहीत. आणि लोकल ट्रेन्सही मध्ये फसणार नाहीत. त्याचबरोबर ज्या ठिकाणी पाणी साचते त्या ठिकाणी आधीच यंत्रणा सज्ज ठेवता येईल.
हे वाचा -
VIDEO: मुंबईच्या क्रॉफर्ड मार्केटमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल
COVID-19: मुंबईतील 11 लाख घरं सील, 50 लाख लोकांना बाहेर पडण्यास मज्जाव