Home /News /mumbai /

मुंबईतून कोरोना असा होणार हद्दपार, लसीकरण मोहिमेच्या पूर्व तयारीसाठी सिटी टास्क फोर्सची बैठक

मुंबईतून कोरोना असा होणार हद्दपार, लसीकरण मोहिमेच्या पूर्व तयारीसाठी सिटी टास्क फोर्सची बैठक

मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर आता 0.97 टक्के इतका नोंदवला गेला असून 1 टक्क्याच्याही खाली हा दर आल्याने मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.

मुंबईत रुग्णवाढीचा सरासरी दर आता 0.97 टक्के इतका नोंदवला गेला असून 1 टक्क्याच्याही खाली हा दर आल्याने मुंबईकरांसाठी ही मोठी दिलासादायक बाब ठरली आहे.

टास्क फोर्सचे अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज दुपारी कृती दलाची पहिली बैठक पार पडली.

    मुंबई, 11 डिसेंबर : कोविड – 19 (कोरोना) संसर्गजन्य आजाराच्या प्रतिबंधासाठी लस उपलब्ध झाल्यानंतर प्रत्यक्ष लसीकरण मोहीम राबविताना बृहन्मुंबई महानगरपालिकेसह सर्व यंत्रणांनी समन्वय राखून आपापली जबाबदारी पार पाडावी. शासनाच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार सर्व पूर्वतयारी वेगाने होत असून, सिटी टास्क फोर्स (मुंबई महानगर कृती दल) च्या माध्यमातून ही लसीकरण मोहीम योग्यरित्या राबविली जाईल, यासाठी प्रयत्न करावेत, असे निर्देश अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) तथा कृती दलाचे अध्यक्ष सुरेश काकाणी यांनी दिले आहेत. कोविड – 19 प्रतिबंधासाठी केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार कोविड – 19 लसीकरण मोहीम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागाने दिलेल्या निर्देशानुसार बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रासाठी कृती दल (सिटी टास्क फोर्स) गठीत करण्यात आला आहे. लसीकरणाच्या अंमलबजावणीच्या दृष्टीने पूर्व तयारीचा आढावा घेण्यासाठी टास्क फोर्सचे अध्यक्ष तथा अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त सुरेश काकाणी यांच्या अध्यक्षतेखाली बृहन्मुंबई महानगरपालिका मुख्यालयात आज दुपारी कृती दलाची पहिली बैठक पार पडली. मुंबईतून कसा हद्दपार होईल कोरोना? बैठकीच्या प्रारंभी कृती दलाचे अध्यक्ष काकाणी यांनी बैठकीचा उद्देश समजावून सांगितला. शासनाच्या मार्गदर्शक सुचनेनुसार कोविड – 19 ची लस उपलब्ध झाल्यानंतर त्याची अंमलबजावणी योग्य तयारीसह आणि पूर्व नियोजनाने करणे आवश्यक आहे. सिटी टास्क फोर्सप्रमाणे क्षेत्रीय स्तरावरील (विभाग कार्यालय स्तर) समिती गठीत करण्याची कार्यवाही देखील लवकर पूर्ण करावयाची आहे. मोहिमेतील सहभागी मनुष्यबळास आवश्यक ते प्रशिक्षण देण्यासाठी मुख्य प्रशिक्षकांना प्रशिक्षण दिले जात आहे. प्रत्यक्ष लसीकरण करण्यासाठी पाच जणांचे एक याप्रमाणे मुंबईत सुमारे 500 पथके नेमली जातील. लसीकरणाच्या लाभार्थ्यास नोंदणीकृत भ्रमणध्वनी क्रमांकावर संदेश प्राप्त होईल. या सर्व कार्यवाहीसाठी व्यवस्थापन प्रणाली तयार करण्यात आली आहे. सर्वात आधी आरोग्य सेवक, त्यानंतर फ्रंटलाईन वर्कर्स, नंतर वय वर्ष 50 पेक्षा अधिक आणि इतर/सहव्याधी असलेले नागरिक या क्रमाने लसीकरण करण्याचे नियोजित आहे. सर्व यंत्रणांनी प्रत्येक टप्प्यावर नेमून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे काटेकोर पालन करणे गरजेचे आहे. त्यासाठी सिटी टास्क फोर्सच्या माध्यमातून संपूर्ण देखरेख केली जाईल, असं ते म्हणाले.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Corona vaccine, Coronavirus, Mumbai

    पुढील बातम्या