Mumbai Fire Update: बॉम्बे सेंट्रल मॉल बेचिराख, सगळं सामान जळून खाक; 24 तासानंतर आग आटोक्यात

Mumbai Fire Update: बॉम्बे सेंट्रल मॉल बेचिराख, सगळं सामान जळून खाक; 24 तासानंतर आग आटोक्यात

आग एवढी प्रचंड होती की आगीने सगळंच भस्मसात करून टाकलं.मॉलच्या आतमध्ये काहीही शिल्लक राहिलेली नाही. कुलिंगला दोन दिवस लागतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

  • Share this:

मुंबई 23 ऑक्टोबर: मुंबईतील बॉम्बे सेंट्रल परिसरात लागलेली आग चोवीस तासानंतर आटोक्यात आली आहे. गेल्या 24 तासांमध्ये संपूर्ण मॉल बेचिराख झाला असून सगळं सामान जळून राख झालं आहे. दिवाळीसाठी म्हणून दुकानदारांनी पाचपट मालाचासाठा करून ठेवला होता. मोबाईल बॅटरी आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू मध्ये झालेल्या स्फोटामुळे आग वाढली अशी माहिती फायर ब्रिगेडने दिली आहे.

आग एवढी प्रचंड होती की आगीने सगळंच भस्मसात करून टाकलं.मॉलच्या आतमध्ये काहीही शिल्लक राहिलेली नाही. सर्व 4 मजली मॉल जळून खाक झाला असून कोट्यवधींचं नुकसान झालं असावं असा अंदाज व्यक्त केला जात आहे.

अजुनही आतमध्ये पडझड सुरू असून कुलिंगला दोन दिवस लागतील असा अंदाज व्यक्त केला जात आहे. हा गर्दीचा भाग असल्याने आणि मॉलला फारसे रस्ते नसल्याने फायर ब्रिगेडलाही आटोक्यात आणण्यासाठी कठिण परिश्रम करावे लागले.

गुरुवारी रात्री उशिरा ही आग लागली. रात्री उशिरा आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या 8 ते 10 गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. मुंबईतील सिटी सेंटर या प्रसिद्ध मॉलमध्ये ही आग लागली. रात्री मॉलमधील दुसऱ्या मजल्यावर मोबाईलच्या दुकानाला लागलेली आग भडकली आणि आगीचे लोळ उठले. या आगीमुळे कोटींचं नुकसान झालं आहे.

आग विझवताना अग्निशमन दलाचा एक कर्मचारी रमेश चौगुले किरकोळ जखमी झाले आहेत. मिळालेल्या माहितीनुसार ऑर्किड टॉवर या जवळच्या इमारतीमधून साधारण 3500 रहिवाशांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं होतं. आगीमुळे परिसरात धुराचे लोळ पसरले होते. नंतर उशीरा हा सगळा धूर निवळण्यास सुरूवात झाली.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 23, 2020, 11:35 PM IST
Tags: fire

ताज्या बातम्या