मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

पुरंदरेंच्या अंत्यसंस्काराबाबतची फाईल 5 तास पडून होती, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

पुरंदरेंच्या अंत्यसंस्काराबाबतची फाईल 5 तास पडून होती, चंद्रकांत पाटलांचा गंभीर आरोप

' मुख्यमंत्र्यांनी लवकर बरं व्हावं, पण त्यासाठी तुम्ही कोणाकडे चार्ज तरी द्यावा, आदित्य ठाकरे यांच्याकडे तरी चार्ज द्या'

' मुख्यमंत्र्यांनी लवकर बरं व्हावं, पण त्यासाठी तुम्ही कोणाकडे चार्ज तरी द्यावा, आदित्य ठाकरे यांच्याकडे तरी चार्ज द्या'

' मुख्यमंत्र्यांनी लवकर बरं व्हावं, पण त्यासाठी तुम्ही कोणाकडे चार्ज तरी द्यावा, आदित्य ठाकरे यांच्याकडे तरी चार्ज द्या'

  • Published by:  sachin Salve

मुंबई, 21 डिसेंबर : हिवाळी अधिवेशनाला (winter season  maharashtra) उद्यापासून सुरुवात होणार आहे. विरोधी पक्षाने चहापानावर बहिष्कार टाकला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackery) हे गेल्या 45 दिवसांपासून मंत्रालयात नाही. त्यांनी मुख्यमंत्रिपदाचा चार्ज कुणाकडे दिला पाहिजे. त्यामुळे शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची फाईल 5 तास पडून होती, असा गंभीर आरोप भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (chandrakant patil) यांनी केला आहे.

हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर पत्रकारांशी बोलत असताना चंद्रकांत पाटील यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackey) यांची प्रकृती लवकरात लवकरच बरी व्हावी अशी आमची प्रार्थना आहे. पण आरोग्याच्या कारणावरून राज्यावर अन्याय करू नका, 45 दिवसांपासून राज्यातील जनतेनं राज्याच्या मुख्यमंत्र्यांना पाहिलेल नाही. मुख्यमंत्र्यांनी लवकर बरं व्हावं, पण त्यासाठी तुम्ही कोणाकडे चार्ज तरी द्यावा, नाहीतर आदित्य ठाकरे यांच्याकडे तरी चार्ज द्यावा, अशी मागणीच पाटील यांनी केली.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचं निधन झालं. त्यावेळी त्यांचे अंतिम संस्कार शासकीय इतमामात करावे या साठीची फाईल 5 तास पडून होती. अशा व्यक्तींबाबत जर ही वेळ येत असेल तर इतरांचं काय, त्यामुळे महाराष्ट्राला रामभरोसे ठेवता येणार नाही, अशी टीकाही पाटील यांनी केली.

विरोधकांच्या प्रश्नांची उत्तर देण्यास सरकार सज्ज

दरम्यान,  विधीमंडळाचं हिवाळी अधिवेशन उद्यापासून सुरु होणार आहे. या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज चहापानाचा कार्यक्रम पार पडला. या अधिवेशनाआधी आज सह्याद्री अतिथीगृहावर राज्य मंत्रिमंडळाची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सहभागी झाले होते. या बैठकीनंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी उद्यापासून सुरू होणाऱ्या हिवाळी अधिवेशनात विरोधकांच्या विविध प्रश्नांना उत्तर देण्यासाठी राज्य सरकार तयार असल्याचा इशारा दिला. या अधिवेशनात ओबीसी आरक्षण ते वीज कनेक्शन कट या साऱ्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी राज्य सरकार तयार असल्याचं अजित पवारांनी सांगितलं. तसेच या अधिवेशनात एकूण 26 विधेयक सादर केली जाणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

First published:

Tags: BJP, Chandrakant patil, भाजप