• Home
 • »
 • News
 • »
 • mumbai
 • »
 • अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, ऑनलाईन प्रवेशाला मिळाली मुदतवाढ, ही आहे अंतिम तारीख

अकरावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी, ऑनलाईन प्रवेशाला मिळाली मुदतवाढ, ही आहे अंतिम तारीख

प्रवेश प्रक्रियेसाठी 21 ऑक्टोबरपर्यंत (11th Admission) मुदत वाढ देण्यात आली आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी 21 ऑक्टोबरपर्यंत (11th Admission) मुदत वाढ देण्यात आली आहे.

प्रवेश प्रक्रियेसाठी 21 ऑक्टोबरपर्यंत (11th Admission) मुदत वाढ देण्यात आली आहे.

 • Share this:
  मुंबई, 18 ऑक्टोबर : कोरोनाची लाट (Corona pandemic) ओसरल्यामुळे महाविद्यालय अखेर सुरू झाली असून 11 वीसाठी प्रवेश दिले जात आहे. मात्र, ऑनलाईन प्रवेश घेण्यासाठी (Online Admission Application) कुणी विद्यार्थी मुकला असेल तर त्याला आणखी एक संधी सरकारने दिली आहे. प्रवेश प्रक्रियेसाठी 21 ऑक्टोबरपर्यंत  (11th Admission) मुदत वाढ देण्यात आली आहे. शिक्षण संचालनालय माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाकडून एक पत्रक प्रसिद्ध करण्यात आले आहे. इयत्ता ११ वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेअंतर्गत अद्याप प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना आणखी एक संधी चालून आली आहे. कुणीही प्रवेशापासून वंचित राहू नये म्हणून प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य (FCFS) तत्त्वावर सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेस 21 ऑक्टोबर पर्यंत मुदतवाढ दिली आहे. 'मी आमदार आहे..', भर बैठकीत रवी राणा आणि यशोमती ठाकूर यांच्यात खडाजंगी, VIDEO राज्यातील मुंबई महापालिका क्षेत्र, पुणे, पिंपरी चिंचवड, नाशिक, अमरावती आणि नागपूर पालिका क्षेत्रात राबविण्यात येत असलेल्या 11 वी केंद्रीय ऑनलाईन प्रवेश प्रकियेमधील FCFS प्रवेश फेरी सध्या सुरू आहे. यापूर्वी राज्यात जाहीर झालेल्या प्रमाणे 18 तारखेला FCFS प्रवेश फेरी समाप्त झाली आहे. पण, अजूनही काही विद्यार्थी हे प्रवेशापासून वंचित आहे. त्यामुळे या विद्यार्थ्यांनाही प्रवेश घेता यावा यासाठी मुतदवाढ देण्यात आली आहे. FCFS प्रवेश फेरीसाठी मुदवाढ FCFS अंतर्गत अर्ज करण्याची तारीख - २२ ऑक्टोबर २०२१ दुपारी १२ वाजेपर्यंत allotment - नंतर प्रवेश निश्चित करणे दिनांक २२ ऑक्टोबर २०२१ रोजी संध्याकाळी ६ वाजेपर्यंत या वाढीव कालावधीमध्ये इयत्ता दहावी उत्तीर्ण असलेले सर्व तसंच एटीकेटी विद्यार्थी पात्र असणार आहे. दिलेल्या वेळेमध्ये उर्वरीत विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित करावे अशी सूचनाही देण्यात आली आहे.
  Published by:sachin Salve
  First published: