...तर संपूर्ण मेट्रो 3 चं काम थांबवावं लागले, हायकोर्टाचा इशारा

मेट्रो ३ चं काम रात्री करू नका असा आदेश देऊनही त्याचं पालन होत नसल्याने हायकोर्टाने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 9, 2017 06:33 PM IST

...तर संपूर्ण मेट्रो 3 चं काम थांबवावं लागले, हायकोर्टाचा इशारा

09 नोव्हेंबर : आमच्या आदेशानंतरही जर मेट्रो ३ चं काम रात्री सुरू असेल तर आम्हाला संपूर्ण मेट्रो ३ चं काम थांबवण्याचाच आदेश द्यावा लागेल असा इशारा मुंबई हायकोर्टाने मेट्रो प्रशासनाला दिलाय.

मेट्रो ३ चं काम रात्री करू नका असा आदेश देऊनही त्याचं पालन होत नसल्याने हायकोर्टाने तीव्र संताप व्यक्त केला आहे.

मुंबई हायकोर्टाच्या आदेशानंतरही मेट्रो ३ चं रात्री काम सुरू राहिल्याची याचिकाकर्त्यांनी आज सुनावणी दरम्यान हायकोर्टाकडे तक्रार केली त्यावर कोर्टाने हा राग व्यक्त केला आहे.

मेट्रो ३ चं रात्री काम सुरू असल्यानं त्याचा आजूबाजूच्या रहिवासीयांना त्रास होत असल्याच्या दक्षिण मुंबईतील रहिवासी राॅबिन जयसिंघानी यांच्या याचिकेवर कोर्टाने रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत काम न करण्याचे आदेश दिले आहेत. मात्र, त्या आदेशाचं उल्लंघन होत असल्याची बाब आता समोर आली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2017 06:33 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...