Home /News /mumbai /

राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण, ईडी उघडणार आघाडी सरकारची 'फाईल'?

राज्याच्या राजकारणाला वेगळे वळण, ईडी उघडणार आघाडी सरकारची 'फाईल'?

2007 ते 2014 च्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार होते. या काळात कृषी विभागामार्फत चालवण्यात आलेल्या योजनात गैरव्यवहार झाल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे.

मुंबई, 04 जानेवारी : महाविकास आघाडी सरकारच्या (MVA Goverment) नेत्यांना आणि त्यांच्या कुटुंबीयांना सक्तवसुली संचालनालय अर्थात ईडीने (ED) नोटीसा बजावल्यामुळे राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. आता  राज्य सरकारचे कृषी विभागाच ईडीच्या रडारवर आले आहे. 2007 ते 2014 या काळात घोटाळ्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. महाविकास आघाडी सरकार स्थापन होऊन 1 वर्ष पूर्ण झाले आहे. पण, आता नवीन वर्षात महाविकास आघाडी सरकारपुढे एकएक अडचणी वाढत चालल्या आहे. नेते आणि आमदारांपाठोपाठ ईडीची नजर आता राज्य सरकारच्या कृषी विभागावर आहे.  2007 ते 2014 हा काळात अर्थात आघाडी सरकारच्या काळातील कृषी विभागाच्या योजनांची ईडी चौकशी करण्याची शक्यता आहे. ... म्हणून पहिल्या घटस्फोटानंतर 8 वर्षांनी मनोज तिवारींनी केलं दुसरं लग्न 2007 ते 2014 च्या काळात काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे सरकार होते. या काळात कृषी विभागामार्फत चालवण्यात आलेल्या योजनात गैरव्यवहार झाल्याचा संशय ईडीने व्यक्त केला आहे.  2007 ते 2014 या काळात कृषी विभागातून सूक्ष्म सिंचन योजनेत घोटाळा झाल्याची शंका ईडीला आहे.  अंदाजे 800 कोटींचा हा व्यवहार असून यात  मोठ्या कंपन्यांचा सहभाग आहे. आधीच शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक आणि त्यांच्या कुटुंबीयांना ईडीने नोटीसा बजावल्या आहे. त्यानंतर शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनाही ईडीने समन्स बजावला आहे. त्याचबरोबर भाजपमधून राष्ट्रवादीत दाखल झालेले एकनाथ खडसे यांनाही भोसरी जमीन गैरव्यवहार प्रकरणात नोटीस बजावली आहे. रिलायन्सला टार्गेट करून चुकीचं चित्र उभं करण्याचा विरोधकांचा प्रयत्न - दरेकर विशेष म्हणजे, महाविकास आघाडी सरकार पाडता येत नसल्यामुळे ईडीचा वापर केला जात असल्याचा आरोप संजय राऊत यांनी काही दिवसांपूर्वी केला होता. त्यानंतर आता ईडीची वक्रदृष्टी राज्य सरकारच्या विभागावरच पडल्यामुळे येणाऱ्या काळात राजकीय वाद आणखी पेटणार अशी चिन्ह आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या