धावत्या बेस्ट बसमध्ये चालकाला ह्रदयविकाराचा झटका, बस घुसली दुकानात

धावत्या बेस्ट बसमध्ये चालकाला ह्रदयविकाराचा झटका, बस घुसली दुकानात

चेंबूर पोलीस स्टेशन समोर बसंत पार्क इथं आज सकाळी 10.45 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे.

  • Share this:

मनोज कुळकर्णी, प्रतिनिधी

मुंबई, 20 ऑक्टोबर : मुंबईमध्ये चेंबूर परिसरात धावत्या बेस्टला अपघात झाला आहे. बस चालकाला ह्रदयविकाराचा झटका आल्यामुळे ही घटना घडली आहे. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जिवीतहानी झाली नाही.

आज सकाळी 10.45 वाजेच्या सुमारास ही घटना घडली आहे. बेस्ट बस क्रमांक 381 ही घाटकोपर स्थानक पूर्वापासून चेंबूरच्या टाटा वीज केंद्राकडे जात होती. बसमध्ये 10 ते 12 प्रवासी प्रवास करत होते.

मुलीसोबत राष्ट्रवादीत प्रवेशाबाबत एकनाथ खडसेंचा मोठा खुलासा, म्हणाले...

चेंबूर पोलीस स्टेशन समोर बसंत पार्क इथं बस पोहोचल्यानंतर बसचालक हरिदास पाटील यांना अचानक  हृदयविकाराचा झटका आला. त्यामुळे पाटील यांच्या गाडीवरचा ताबा सुटला.

बसवरील ताबा सुटल्यानंतर रस्त्याच्या डाव्या बाजूला असलेल्या फुटपाथवर बस आदळली आणि त्यानंतर जवळच असलेल्या भाजीच्या दुकानात घुसली. बसचा वेग जास्त असल्यामुळे पुढे जाऊ ती थेट सिग्नलवर जाऊन आदळली. या घटनेमुळे एकच गोंधळ उडाला होता. बस आदळल्यानंतर प्रवाशांनी तात्काळ बसमधून बाहेर उड्या टाकल्या.

फडणवीस यांनी केले शरद पवारांच्या भूमिकेचं स्वागत, म्हणाले...

बसचालक पाटील यांच्याकडे जाऊन पाहिले असता ते बेशुद्ध अवस्थेत आढळून होते. त्यांना तातडीने राजावाडी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी पोलिसांनी धाव घेतली. बेस्टच्या कर्मचाऱ्याने घटनास्थळी पोहोचून अपघातग्रस्त बाजूला हटवली आहे.

Published by: sachin Salve
First published: October 20, 2020, 12:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या