मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /नायगाव खाडीवरील रेल्वे पुलाला मोठे जहाज धडकले, जागेवरच बुडाले

नायगाव खाडीवरील रेल्वे पुलाला मोठे जहाज धडकले, जागेवरच बुडाले

यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या असून रेल्वे पुलाखालून नौकानयनाला बंदी केली आहे. तरी मात्र,

यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या असून रेल्वे पुलाखालून नौकानयनाला बंदी केली आहे. तरी मात्र,

यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या असून रेल्वे पुलाखालून नौकानयनाला बंदी केली आहे. तरी मात्र,

वसई, 14 फेब्रुवारी : पश्चिम रेल्वेच्या नायगाव खाडीवरील एका रेल्वे पुलाला रेती वाहून नेणाऱ्या ड्रेझरने (dredger boat) जोरदार धडक दिल्याची घटना घडली आहे. धडक दिल्यानंतर तोल जाऊन ड्रेझर पाण्यात बुडाला आहे. तर या दुर्घटनेत पुलाच्या काही भागाचे नुकसान झाले आहे.

शुक्रवारी मध्यरात्री ही घटना घडली आहे. रेती घेऊन जाणाऱ्या ड्रेझर भरधाव वेगात जात होता. त्याचवेळी नायपुलाखाली आल्यानंतर उंचीचा अंदाजा आला नाही. त्यामुळे ड्रेझरने थेट पुलाला धडक दिली. ही धडक इतकी जोरात होती की, यात ड्रेझरचा तोल गेला पाण्यात बुडाला.

'जगाला वाचवण्यासाठी बलिदान द्यावं लागेल'; असं म्हणत महिलेने केली मुलाची हत्या

या घटनेची माहिती माणिकपूर पोलिसांना मिळाल्यानंतर  त्यांनी घटनास्थळचा पंचनामा केला आहे. पुलाचे नुकसान झाल्याप्रकरणी जहाज मालकावर पोलिसांकडून कारवाई करण्यात येणार आहे.

अखेर अवघ्या काही तासांत माणिकपूर पोलिसांनी या प्रकरणी दोन आरोपींना अटक केली आहे. तुलसी महातो (वय 46), शिवचारण महातो (वय 36) अशी दोन आरोपींची नावे असून पुढील तपास माणिकपूर पोलीस करीत आहेत.

पूजा चव्हाण प्रकरणावरुन संजय राऊतांनी भाजप नेत्यांना फटकारले

यापूर्वीही अशा अनेक घटना घडल्या असून रेल्वे पुलाखालून नौकानयनाला बंदी केली आहे. तरी मात्र प्रत्यक्षात बेकायदेशीररित्या पुलाखालून भरती व ओहोटीचा अंदाज घेऊन जहाजे व ड्रेझर नेले जात आहेत.

First published: