मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कारकून शब्द झाला हद्दपार, महसूलमंत्र्यांनी पदाला दिलं नवीन नाव

कारकून शब्द झाला हद्दपार, महसूलमंत्र्यांनी पदाला दिलं नवीन नाव

पदाचं नावच बदलून टाकावं, अशी मागणी महसूल संघटनेनं केली होती. अखेर ही मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली आहे.

पदाचं नावच बदलून टाकावं, अशी मागणी महसूल संघटनेनं केली होती. अखेर ही मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली आहे.

पदाचं नावच बदलून टाकावं, अशी मागणी महसूल संघटनेनं केली होती. अखेर ही मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली आहे.

  • Published by:  Akshay Shitole
मुंबई दि.21 : सार्वजनिक जीवनात काम करणाऱ्या व्यक्तींना अनेकदा ते ज्या पदावर काम करतात, त्याच नावाने ओळखले जाते. आपल्याकडे कारकून, लिपिक अशा पदावर काम करणाऱ्यांना अनेकदा तुच्छपणे हिणवलं जात. या पार्श्वभूमीवर पदाचं नावच बदलून टाकावं, अशी मागणी महसूल संघटनेनं केली होती. अखेर ही मागणी राज्य सरकारकडून मान्य करण्यात आली आहे. महसूल विभागांतर्गत क्षेत्रीय कार्यालयातील लिपिक गट पदाचे पदनाम आता महसूल सहायक करण्यात आल्याची माहिती महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली. अनेक ठिकाणी कारकून हा शब्द तिरस्कारांने वापरला जात असल्याने हा शब्द बदलून द्या म्हणून अनेक वर्षे मागणी सुरू होती. महाराष्ट्र राज्य महसूल कर्मचारी संघटनेची राज्यातील महसूल विभागांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालयातील ‘लिपिक गट क‘ कर्मचाऱ्यांची तांत्रिक लिपिक ऐवजी ‘महसूल सहायक‘ असे पदनाम करावे अशी मागणी होती. राज्य शासनाने महसूल कर्मचारी संघटनेची ही मागणी मान्य केली आहे. सदर कर्मचाऱ्यांना पदनाम बदलामुळे शासनावर कोणताही आर्थिक बोजा पडणार नसल्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सांगितलं आहे. दुसरीकडे, बाळासाहेब थोरात यांनी गणेशोत्सवाबाबतही विशेष आवाहन केलं आहे. गणेशोत्सव हा आपल्या सर्वांसाठी आनंदाचा आणि उत्साहाचा सोहळा. कोविड-१९ चा मुकाबला करण्यासाठी सध्या राज्यात लॉकडाऊन करण्यात आला आहे. राज्यात ‘मिशन बिगीन अगेन‘ करण्यात आले असले तरी आपण सगळ्यांनी यापुढील काळातही काळजी घेणे आवश्यक आहे. मात्र यावर्षी आपण आपल्या सुरक्षा आणि स्वच्छतेला प्राधान्य देत यंदाचा गणेशोत्सव साधेपणानं साजरा करूया. जगावर आलेले हे संकट टळूदे, पुन्हा एकदा जनजीवन गतिमान होऊ दे, अशी प्रार्थनाही गणरायाला आपण सर्वांनी करूया असं आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केलं आहे.
First published:

Tags: Balasaheb thorat

पुढील बातम्या