राज्यात कॉलेजेस केव्हा सुरू होणार? शिक्षण मंत्र्यांनी केला खुलासा

राज्यात कॉलेजेस केव्हा सुरू होणार? शिक्षण मंत्र्यांनी केला खुलासा

'विद्यार्थ्यांना जी मार्कशीट दिली जात आहे ती नेहमी देतो तशीच मार्कशीट आहे. त्यात कोविडचा उल्लेख नाही. त्याबाबत गैरसमज पसरविला जात आहे.'

  • Share this:

मुंबई 06 नोव्हेंबर: राज्यात आता Unlockची प्रक्रिया सुरू झाली आहे. सगळे व्यवहार पुन्हा सुरू होत आहे. त्यामुळे कॉलेजेस (College) केव्हा सुरू होणार याविषयी सारखी विचारणा होत असते. सोशल मीडियावरही त्यावर चर्चा होत असते. उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत यांनी त्यावर आता महत्त्वाचा खुलासा केला आहे. कॉलेजेस केव्हा सुरू करावीत याबाबत अजुनही निर्णय झालेला नाही. विद्यार्थ्यांची सुरक्षा आणि इतर सर्व विचार करूनच अंतिम निर्णय घेणार असल्याची माहिती त्यांनी दिली.

सामंत म्हणाले, दिल्लीत आणि केरळमध्ये दुसरी लाट आल्याचं सांगितलं जातेय. मात्र आपल्या राज्यात कॉलेज सुरू करण्याबाबत कोणताही निर्णय झाला नाही. युजीसीने (UGC) गाईडलाईन्स दिल्या आहेत.

शासनाशी चर्चा करून विद्यापीठाने निर्णय घ्यावेत असं युजीसी ने सांगितलं आहे. स्थानिक परिस्थिती आणि विद्यार्थ्यांची सुरक्षा या सगळ्यांचा विचार करूनच निर्णय घ्या असंही त्यांनी सुचवलं आहे. त्यामुळे दिवाळीनंतर सगळ्या कुलगुरुंची बैठक घेऊन अंतिम निर्णय घेऊ अशी माहितीही त्यांनी दिली.

आणखी काय म्हणाले शिक्षणमंत्री?

13 विद्यापीठात अपवाद वगळता सगळ्या परीक्षा पार पडल्या आहेत. 2 लाख 50 हजार विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.  काही विद्यार्थ्यांनी ऑफलाईन परीक्षा दिली.

काही विद्यार्थ्यांची परीक्षा प्रतिबंधित झोन, पूर आणि अन्य कारणांमुळे राहिली असेल तर त्यांचीही परीक्षा ही दिवाळीनंतर घेणार असल्याचं पुण्याच्या कुलगुरुंनी सांगितलं आहे.

'विद्यार्थ्यांना जी मार्कशीट दिली जात आहे ती नेहमी देतो तशीच मार्कशीट आहे. त्यात कोविडचा उल्लेख नाही. त्याबाबत गैरसमज पसरविला जात आहे.'

सगळ्या महाविद्यालयाने दाखवून दिलं की ऑनलाइन आणि ऑफलाईन परीक्षा घेऊन चांगला निकाल लागला आहे.

मुंबईत, पुणे, सोलापूर, नागपूर इथं बॅक फायर झालं त्याचसाठी समिती नेमली आहे. त्या कंपनीला आम्ही ब्लॅक लिस्ट मध्ये टाकणार आहे.

येत्या 8 ते 10 दिवसात ज्या सिस्टम डॅमेज झाल्या आहेत त्या का झाल्या हे चित्र स्पष्ट होईल. त्याबाबत सायबर सेल तपास करत आहे.

Published by: Ajay Kautikwar
First published: November 6, 2020, 4:36 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading