नवी मुंबई, ता. 24 मे : नवी मुंबई महापालिका शाळेत एक मोठा अपघात झाला आहे. महापालिकेच्या शाळेचा गेट पडल्याने एक विद्यार्थ्याचा मृत्यू झाला आहे. सौरभ चौधरी असं या मृत विद्यार्थ्याचं नाव आहे. सौरभ 5वी इयत्तेत शिकत होता. सकाळी 9:30 वाजताच्या सुमारास हा सगळा प्रकार घडला.
हा गेट पडल्यानं एक विद्यार्थी गंभीर जखमीदेखील झाला आहे. जखमी विद्यार्थ्याच्या पायाला मोठी दुखापत झाली आहे. महत्त्वाचं म्हणजे 40 कोटी रुपये खर्च करुन महापालिकेची ही नवीन शाळा उभारण्यात आली होती. यंदाच्या शालेय वर्षापासून ही शाळा सुरु होणार होती. पण त्याआधीच या शाळेच गेट पडल्याने तिथे खेळत असलेल्या विद्यार्थ्याचा त्याच्यात जीव गेला आहे.
कोपरखैराणेमधील सेक्टर 18मध्ये ही शाळा उभारण्यात आली आहे. अवाढव्य खर्च केला म्हणून तत्कालीन महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी तिथल्या इंजिनिअरला कामावरुन निलंबित केलं होतं. त्यामुळे ही शाळा सुरुवातीपासून वादग्रस्त ठरलेली आहे. असं म्हणायला हरकत नाही.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Navi mumbai, नवी मुंबई