भाजप प्रवेशासाठी नारायण राणे 'वेटिंग लिस्ट'वरच

भाजप प्रवेशासाठी नारायण राणे 'वेटिंग लिस्ट'वरच

या आधीही राणे यांना भाजपने बराच काळ वेटिंगवरच ठेवलं होतं. नंतर ते भाजपच्या मदतीने खासदार झाले. मात्र ते दिल्लीत फार कधी रमलेच नाहीत.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 30 ऑगस्ट : निवडणुकीच्या तोंडावर नेते पक्ष सोडून जात असल्यामुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला जोरदार हादरे बसत आहेत. नेत्यांचं पक्ष बदलण्याचं प्रमाण एवढं वाढलं की आता त्याला मेगाभरती असं नावही पडलं. या मेगाभरतीचा आणखी एक टप्पा पुढच्या आठवड्यात होणार असून त्याचा मुहूर्तही ठरला आहे. 1 सप्टेंबरला सोलापूरात भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत राणा जगजितसिंह, जयकुमार गोरे आणि धनंजय महाडिक हे दिग्गज नेते भाजपवासी होणार आहेत. मात्र ज्येष्ठ नेते नारायण राणे हे अद्याप वेटिंग लिस्टवरच असून ते केव्हा प्रवेश घेतील हे निश्चित झालेलं नाही.

राणे आपला महाराष्ट्र स्वाभीमान हा पक्ष भाजपमध्ये विलीन करणार असल्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत. मुख्यमंत्री सांगतील तेव्हा भाजपप्रवेश होईल असंही राणे यांनी सांगितलं होतं. पण माशी कुठं शिंकली हे गुलदस्त्यातच आहे. या आधीही राणे यांना भाजपने बराच काळ वेटिंगवरच ठेवलं होतं. नंतर ते भाजपच्या मदतीने खासदार झाले. मात्र ते दिल्लीत फार कधी रमलेच नाहीत.

निवडणूक आयोगाच्या आधीच अर्थमंत्र्यांनी सांगितली विधानसभेच्या निवडणुकीची तारीख

उदयनराजे मोदींच्या उपस्थितीत करणार प्रवेश

केंद्रीय गृहमंत्री आणि भाजप अध्यक्ष अमित शहा यांच्या उपस्थितीत सोलापूरमध्ये उदयनराजे भाजपमध्ये प्रवेश करतील, असं बोललं जात होतं. मात्र उदयनराजे अमित शहा यांच्या नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत थेट दिल्लीत भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी माहिती आता सूत्रांकडून मिळाली आहे. जोरदार शक्तीप्रदर्शनासह उदयनराजेंना पक्षात घेण्याचा भाजपचा विचार आहे.

दरम्यान, उदयनराजे भोसले राष्ट्रवादीच्या खासदारकीचा राजीनामा देऊन भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढवणार असल्याची माहिती आहे. उदनराजेंनी भाजपमध्ये प्रवेश केल्यास राष्ट्रवादी बॅकफूटवर जाण्याची शक्यता आहे. कारण साताऱ्यासह महाराष्ट्रातील इतर भागातही उदयनराजेंना मानणारा एक मोठा वर्ग आहे.

...आणि पद्मसिंह पाटलांवरच्या प्रश्नावर शरद पवार भडकले!

काँग्रेसला धक्का बसणार?

महाराष्ट्रात अडचणीत असलेल्या काँग्रेसला आणखी धक्का बसणार आहे. कारण वंचित आघाडी काँग्रेससोबत येण्याचे सर्व प्रयत्न निष्फळ ठरत असल्याची कबूली विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी दिलीय. दिल्लीत आज काँग्रेसच्या छाननी समितीची बैठक झाली. या बैठकीनंतर 'न्यूज18 लोकमत'शी बोलताना त्यांनी ही कबूली दिली. सुरुवातीला छाननी समितीत वडेट्टीवार यांचं नाव घातलेलं नव्हतं. नंतर त्यांनी नाराजी व्यक्त करताच दिल्लीतून सूत्र हलली आणि त्यांचं नाव समाविष्ट करण्यात आलं होतं. मध्य प्रदेश काँग्रसचे नेते ज्योतिरादित्य शिंदे हे या समितीचे अध्यक्ष आहेत. आजच्या बैठकीत राज्यातल्या सर्व 288 मतदार संघाचा आढावा घेण्यात आला.

महाराष्ट्र काँग्रेसला आता दिल्लीतूनही झटका, मोठा नेता पक्ष सोडण्याच्या तयारीत

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजधानी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात असलेल्या वॉर रुममध्ये छाननी समितीची ही पहिलीच बैठक होती. या समितीची दुसरी बैठक आता 5 सप्टेंबर रोजी होणार आहे. वडेट्टीवार म्हणाले, काँग्रेसला वंचितशी आघाडी करायची आहे मात्र त्यांनी अटीच अशा घातल्या आहेत की आघाडी करणं अशक्यच आहे. त्यांना काँग्रेससोबत आघाडी करण्याची इच्छाच नाही अशी टीकाही त्यांनी प्रकाश आंबेडकरांवर केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 30, 2019 06:48 PM IST

ताज्या बातम्या