मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कोरोना नियमाची ऐशीतैशी, मनसे नेत्याने डान्सबारचा VIDEO आणला समोर

कोरोना नियमाची ऐशीतैशी, मनसे नेत्याने डान्सबारचा VIDEO आणला समोर

 ग्राहक, बारबाला आणि वेटर कुणाच्याही चेहऱ्यावर मास्क नाही. बारबालांवर पैशांची उधळण सुरू असल्याचेही...

ग्राहक, बारबाला आणि वेटर कुणाच्याही चेहऱ्यावर मास्क नाही. बारबालांवर पैशांची उधळण सुरू असल्याचेही...

ग्राहक, बारबाला आणि वेटर कुणाच्याही चेहऱ्यावर मास्क नाही. बारबालांवर पैशांची उधळण सुरू असल्याचेही...

मुंबई, 11 मार्च : राज्यात कोरोनाबाधित (Corona) रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे चिंतेचं वातावरण आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून मास्क (Mask) आणि सोशल डिस्टन्ससिंगचे (Social distance) नियम पाळण्याचे आवाहन वारंवार सरकारकडून केले जात आहे. पण, मुंबईतील (Mumbai) पब्ज  (Pub) आणि डान्सबारमध्ये  (Danc bar) कोरोनाचे नियम धाब्यावर बसवले जात आहे. मनसेनं (MNS) आणखी एका डान्सबारचा व्हिडीओ समोर आणला आहे.

मनसेचे सरचिटणीस नयन कदम यांनी मुंबईतील बोरिवली परिसरातील एका डान्सबारची पोलखोल केली आहे. बोरिवलीतील क्लब नाईन डान्सबार मध्यरात्री उशिरापर्यंत सुरू होता. या डान्सबारमध्ये कोरोनाचे नियम आणि अटी पायदळी तुडवले जात असल्याचे समोर आले आहे. डान्सबारमध्ये सोशल डिस्टंन्ससिंगचा पुरता फज्जा उडाला आहे.

बारमध्ये कुणीही मास्क घातलेले नव्हते. ग्राहक, बारबाला आणि वेटर कुणाच्याही चेहऱ्यावर मास्क नाही. बारबालांवर पैशांची उधळण सुरू असल्याचेही या व्हिडीओ मध्ये दिसत आहे.

इंग्लंडच्या फास्ट बॉलरचा हार्ट अटॅकने मृत्यू, करियरमध्ये घेतल्या 560 विकेट

याआधीही मनसेचे नेते संतोष धुरी यांनी पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांचा मतदार संघ असलेल्या वरळीत पब्ज मध्यरात्रीपर्यंत सुरू असल्याचा व्हिडीओ समोर आणला होता. त्यानंतर अधिवेशनात आदित्य ठाकरे यांनी या प्रकरणाची दखल घेऊन कारवाईचे आदेश दिले होते.

बाइक चालवताना स्टंट करणं पडलं महाग, VIDEO व्हायरल होताच पोलिसांनी केली अटक

पण, त्यानंतर सुद्धा मुंबईतील उच्चभ्रू समजल्या जाणाऱ्या जुहू परिसरातील पब्ज मध्यरात्रीपर्यंत सुरू असल्याचा व्हिडीओ समोर आला होता. जुहू येथील आर अड्डा (R Adda) या पब्जचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. कोरोनाचा संसर्ग वाढू नये म्हणून पब्ज आणि बारला मध्यरात्रीनंतर सुरू ठेवण्यास मनाई करण्यात आली आहे. पण सर्व नियम धाब्यावर बसवून बिनधास्तपणे पब्ज सुरू असल्याचे समोर आले आहे. आता बोरिवलीमध्ये डान्सबारचा व्हिडीओ समोर आला आहे.

First published:

Tags: मुंबई