Home /News /mumbai /

स्वयंपाक करताना झाला कुकरचा स्फोट, आई आणि मुलगी झाली जखमी

स्वयंपाक करताना झाला कुकरचा स्फोट, आई आणि मुलगी झाली जखमी

स्फोटाच्या हादऱ्यात त्या महिलेच्या हाताला मार लागला तर मुलगी जोरात खाली पडली. घराच्या सगळ्या काचा फुटल्या.

    मुरबाड 11 मे: मुरबाड तालुक्यातील सोनारपाडा भगातील एका घरात गॅस वरील कुकरचा स्फोट झाला, यात महिला आणि तीची एक वर्षाची मुलगी किरकोळ जखमी झाली आहे. सोनार पाडा भागातील पोतदार बिल्डिंगमध्ये प्रधान कुटुंब राहतं. त्यांच्याकडे हा अपघात झाला.दुपारच्या सुमारास नेहमी प्रमाणे स्वयंपाक घरात जेवणाची लगबग सुरू होती. गॅसवर कुकर सुरू होता आणि अचानक कुकरचा स्फोट झाला. या स्फोटाचा हादरा एवढा भीषण होता की घराच्या खिडक्यांच्या काचा फुटून चक्का चूर झाल्या. स्फोट झाला तेव्हा स्वयंपाकघरात मिसेस प्रधान आणि त्यांची एक वर्षाची मुलगी खेळत होती. स्फोटाच्या हादऱ्यात त्या महिलेच्या हाताला मार लागला तर मुलगी जोरात खाली  पडली. सुदैवाने मोठा अनर्थ टळला असून माय लेकीला गंभीर दुखापत झाली नाही. या आधीही कुकरच्या अपघाताच्या घटना घडल्या आहेत. त्यामुळे कुकर लावताना काळजी घेण्याची सूचना वारंवार केली जाते. कुकरमध्ये योग्य प्रमाणात पाणी टाकणे, कुकरची रिंग आणि शिट्टी निट आहे की नाही याची नियमित तपासणी करणे. कुकरचं झाकन नीट लागलं की नाही हे तपासणे. आणि कुकर गरम असताना झाकण न काढणे अशा गोष्टींची काळजी घेण्याच्या सूचना कायम केल्या जातात. हेही वाचा - Lockdown 17 मेनंतरही वाढू शकतो, पंतप्रधान आणि मुख्यंत्र्यांची 6 तास चालली बैठक कोरोनाबाधितांची संख्या वाढल्याने हादरलं केंद्र सरकार, तयार होतोय नवा Action Plan ‘बाबा मला नाही जायचं’..4 वर्षांची कोरोनाग्रस्त चिमुरडी ओक्साबोक्शी लागली रडू
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या