Home /News /mumbai /

मंत्रिमंडळ फेरबदल : शिवसेनेची खाती राष्ट्रवादीला का दिली? आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर

मंत्रिमंडळ फेरबदल : शिवसेनेची खाती राष्ट्रवादीला का दिली? आदित्य ठाकरेंनी दिलं उत्तर

राज्य मंत्रिमंडळावरील राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) वर्चस्व वाढलं आहे. राष्ट्रवादीच्या 4 मंत्र्यांना शिवसेनेची खाती मिळाली आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढलेल्या वर्चस्वाला शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी उत्तर दिलं आहे.

पुढे वाचा ...
     मुंबई, 27 जून : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या गटाला दणका दिलाय. ठाकरे यांनी शिंदे गटातील मंत्र्यांची खाती काढून घेतली आहेत. त्याचबोबर मंत्र्यांच्या खात्याचं फेरवाटप केलंय. नव्या फेरवाटपात राज्य मंत्रिमंडळावरील राष्ट्रवादी काँग्रेसचं (NCP) वर्चस्व वाढलं आहे. राष्ट्रवादीच्या 4 मंत्र्यांना शिवसेनेची खाती मिळाली आहेत. मंत्रिमंडळातील राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाढलेल्या वर्चस्वाला शिवसेना नेते आणि मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी उत्तर दिलं आहे. काय म्हणाले ठाकरे ? आदित्य एका कार्यक्रमासाठी मुंबईतील वरळीमध्ये आले होते. वरळी हा ठाकरे यांचा विधानसभा मतदारसंघ आहे. त्यावेळी या प्रश्नाला उत्तर देताना, 'परिवारानं धोका दिला असला तरी मित्रपक्ष खंबीर होते. काँग्रेस-राष्ट्रवादीने पहिल्यापासून आम्हाला साथ दिली आहे. शरद पवार यांनी पहिल्यापासूनच मुख्यमंत्र्यांना विश्वास दिला आहे,' असं उत्तर त्यांनी दिली. राज्यात अनेक कामं सध्या खोळंबली आहेत, त्यामुळे हे खातेवाटप गरजेचं होतं, असा दावा त्यांनी केला. राष्ट्रवादीचं वर्चस्व वाढलं शिंदे गटासोबत असलेल्या शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांची खाती मुख्यमंत्र्यानी काँग्रेस आणि  राष्ट्रवादीच्या मंत्र्यांकडे सोपवली आहेत.  राष्ट्रवादीच्या 4 तर काँग्रेसच्या 2 मंत्र्यांना ही खाती देण्यात आली आहेत.  शंभूराज  देसाई यांच्याकडील गृह ग्रामीण खातं राष्ट्रवादीच्या संजय बनसोडे यांच्याकडे सोपवण्यात आलंय. तर काँग्रेसच्या विश्वजीत कदम यांच्यावर वित्त, नियोजन, कौशल्य विकास व उद्योजकता खात्याची जबाबदारी असेल. काँग्रेसच्याच सतेज उर्फ बंटी पाटील यांना राज्य उत्पादन शुल्क खात्याचा कार्यभार मिळाला आहे. बंडखोर आमदारांना कोर्टाकडून मुभा, 12 जुलैपर्यंत कारवाई टळली राजेंद्र  यड्रावकर यांच्याकडील सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण ही खाती विश्वजीत कदम यांना तर वैद्यकीय शिक्षण आणि वस्त्रोद्योग खाते प्राजक्त तनपुरे यांना सतेज पाटील यांना अन्न व औषध प्रशासन तर राष्ट्रवादीच्या आदिती तटकरे यांना सांस्कृतिक खात्याच्या राज्यमंत्रीपदाचा कार्यभार देण्यात आला आहे.
    Published by:Onkar Danke
    First published:

    Tags: Aaditya thackeray, NCP, Shivsena

    पुढील बातम्या