'कॅग'ने केली मुंबई महापालिकेचे 'पोलखोल', ओढले हे ताशेरे

'कॅग'ने केली मुंबई महापालिकेचे 'पोलखोल', ओढले हे ताशेरे

मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये एवढ्या त्रृटी असतील तर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च कशावर केले जातात असा सवाल आता विचारला जातोय.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई 2 जुलै : सोमवारच्या पावसाने मुंबई महापालिकेच्या कामांची पोलखोल झाली. कितीही कामं केली असल्याचा दावा पालिका करत असली तरी त्यात किती त्रृटी आहेत हे 'कॅग'ने आपल्या अहवालात दाखवून दिलंय. मुंबईत पडणारा पाऊस आणि पाणी जाण्यासाठीचे मार्ग याचा अभ्यास करून जी दिर्घकालीन उपाययोजना करावी लागते ती झाली नसल्याचं कॅगने म्हटलं आहे. नियोजनाचा अभाव, अक्षम्य दुलर्क्ष, हेळसांडपणा, पायाभूत सुविधांचा अभाव यामुळे मुंबईची दैना झाल्याचं त्यांच्या अहवालात म्हटलं आहे. फक्त काही तास जरी जोराचा पाऊस झाला तरी मुंबईची जीवन वाहिनी असलेली लोकल सेवा ठप्प होते आणि लाखो मुंबईकरांचे हाल होतात हेच पुन्हा एकदा दिसून आलंय.

काय आहे 'कॅग'च्या अहवालात?   

- मुंबई मनपाची गटार व्यवस्था सदोष असल्याचे कॅगच्या अहवालात ताशेरे

- नाल्यांची  रचना सुमार आहे. अनेक ठिकाणी 100 वर्ष जुनीच व्यवस्था आहे.

- भरती ओहोटींमुळेही गटारांवर परिणाम होतं. त्यामुळे पाण्याच्या निचऱ्याचं योग्य नियोजन नाही.

- यंत्रणा प्रचंड गाळाने भरलेली आहे.

- 45 विसर्गनलिकांपैकी केवळ 3 ठिकाणी पुराच्या पाण्याला बाहेर जाण्यासाठी दरवाजे आहेत जिथून पाणी गुरुत्वाकर्षणानं बाहेर पडतं.

- 25 मिलीमीटर प्रति तास एवढ्या पावसासाठीच गटारांची क्षमता आहे.

- अनेक मोठ्या नाल्यांमध्ये इतर केबल्स, पाईप्स जात असल्यामुळे नाल्यांच्या पाणी वाहून नेण्याच्या क्षमतेमध्ये अडथळा निर्माण होतो.

- सुमार कामगिरी आणि सेवा पुरवठादारांकडून खराब झालेल्या नाल्यांच्या दुरुस्तीकडे अक्षम्य दुर्लक्ष झालंय.

- छोट्या नाल्या अयोग्य जागी असणे आणि प्रभावी नसणं त्यामुळेही पाण्याचा निचरा होत नाही.

मुंबईच्या पायाभूत सुविधांमध्ये एवढ्या त्रृटी असतील तर दरवर्षी कोट्यवधी रुपये खर्च कशावर केले जातात असा सवाल आता विचारला जातोय.

First published: July 2, 2019, 5:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading