Home /News /mumbai /

BMC चा मोठा निर्णय : तुमच्या इमारतीतील कोरोना रुग्णसंख्येवरुन होणार कारवाई

BMC चा मोठा निर्णय : तुमच्या इमारतीतील कोरोना रुग्णसंख्येवरुन होणार कारवाई

पालिकेच्या या निर्णयाबाबत मुंबईकरांनी जागृत राहणं गरजेचं आहे

    मुंबई, 16 सप्टेंबर : मुंबईत (Mumbai) कोरोना व्हायरसचा (Coronavirus) संसर्ग रोखण्यासाठी बृहन्मुंबई नगर निगम (BMC) ने मोठा निर्णय घेतला आहे. बीएमसीने सांगितले की जर कोणत्याही इमारतीत 10 वा त्याहून अधिक कोरोना रुग्ण सापडल्यास त्या इमारतीला सील करण्यात येणार आहे. BMC च्या आरोग्य विभागाने मंगळवारी संशोधित नियम जारी केला आहे. एका बैठकीत पालिकेचे आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी कोविड-19 च्या परिस्थितीची समीक्षा केल्यानंतर हा निर्णय घेतला. यापूर्वी बीएमसीने (BMC) सांगितले होते की, एक सोसायटी वा इमारतीत कोविड-19 चे रुग्ण समोर आल्यानंतर केवळ त्या मजल्यालाही सील करण्यात येईल, यासाठी संपूर्ण इमारत सील करण्याची गरज नाही. हे ही वाचा -मुंबईकरांची वाढली चिंता! बरे झालेल्या 4 रुग्णांना पुन्हा झाला कोरोना बीएससीच्या नव्या नियमांअनुसार दोन वा अधिक मजल्यावर 10 किंवा त्याहून अधिक रुग्ण समोर आल्यानंतर पूर्ण इमारत सील करण्यात येईल आणि एका घरात एक किंवा त्याहून अधिक रुग्ण समोर आल्यानंतर आंशिक रुपात सील करण्यात येईल. त्यांनी सांगितले की संबंधित सहाय्यक नगरपालिका आयुक्त वा आरोग्य अधिकारी कोविड-19 चा प्रसार रोखण्यासाठी संपूर्ण इमारतीला सील करण्याचा निर्णय घेऊ शकतात. मात्र जर कोणताही विशेष मजला किंवा विंग सील करुन संसर्ग पसरण्याची भीती असल्यास इमारत सील करण्यात येऊ शकते. हे ही वाचा-राज्यात 24 तासांतला कोरोना बळींचा उच्चांक; काळजी वाढवतील आजचे Corona Updates मुंबईत कोरोनाचा आकडा 1.75 लाखांवर मुंबईत मंगळवारी कोरोना व्हायरसचे 1585 नवीन प्रकरणं समोर आल्यानंतर संसर्ग झालेल्या रुग्णांची एकूण रुग्णसंख्या 173534 पर्यंत पोहोचली आहे. तर 49 जणांचा मृत्यू झाला आहे. आतापर्यंत येथील मृतांचा आकडा 8227 पर्यंत पोहोचला आहे. मंगळवारपर्यंत एकूण 8763 इमारत सील करण्यात आली होती.
    Published by:Meenal Gangurde
    First published:

    Tags: Corona

    पुढील बातम्या