IPL सामन्यांवर सट्टा लावणारे मोठं  रॅकेट उद्ध्वस्त , हवाला मार्फत दिले जात होते पैसे

IPL सामन्यांवर सट्टा लावणारे मोठं  रॅकेट उद्ध्वस्त , हवाला मार्फत दिले जात होते पैसे

या प्रकरणी पोलीसांनी 11 जणांना अटक केली आहे. यात चार मुख्य सट्टेबाजांचाही समावेश आहे. त्यांच्याकडून 17 मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत.

  • Share this:

रायगड 07 ऑक्टोबर:  आयपीएलच्या क्रिकेट सामन्यांवर सट्टा लावणारे एक मोठं रॅकेट रायगड पोलीसांनी उद्ध्वस्त  केले आहे. या प्रकरणी 11 जणांना अटक करण्यात आली आहे. रायगड पोलिसांच्या क्राईम ब्रांचने ही कारवाई केली असून आरोपींना कर्जत, ठाणे आणि मुंबई परीसरातून ताब्यात घेण्यात आले आहे.

आयपीएलचे सामाने सुरु झाल्यानंतर जिल्ह्यात कुठे सट्टाबाजार सुरु आहे अथवा नाही याची तपासणी करण्याचे निर्देश पोलीस अधिक्षक अनिल पारस्कर आणि अप्पर पोलीस अधिक्षक सचिन गुंजाळ यांनी दिले होते. यानंतर स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाने जिल्ह्यातील विवीध भागात शोध मोहिम सुरु केली. यात कर्जत तालुक्यातील एका रिसॉर्टमध्ये सट्टा लावला जात असल्याची माहिती पथकाला मिळाली. या माहितीची पडताळणी करून स्थानिक गुन्हा अन्वेशन विभागाने पथकाने कर्जत येथील रिसॉर्टवर धाड टाकली आणि सट्टा खेळणाऱ्यांना अटक केली.

पोलिसांच्या कारवाईमुळे आयपीएल सट्टा रॅकेटचा पर्दाफाश झाला आहे. ही टोळी आठ मोबाईल अँप्लिकेशनच्या साह्याने सट्टा लावत होती. प्रत्येक सामन्यानंतर ठराविक पॉईंट्स सट्टा लावणाऱ्यांना दिले जात होते. आठवड्यानंतर जमा झालेल्या पॉईंट्साठी सट्टा खेळणाऱ्यांना हवाला मार्फत रोख रक्कम दिली जात होती.

मराठा आरक्षण: ‘MPSCच्या परीक्षांबाबत मुख्यमंत्री गुरुवारी घेणार अंतिम निर्णय’

या प्रकरणी पोलीसांनी 11 जणांना अटक केली आहे. यात चार मुख्य सट्टेबाजांचाही समावेश आहे. त्यांच्याकडून 17 मोबाईलही जप्त करण्यात आले आहेत. आणखी चार जणांचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

क्राईम ब्राँचचे ज्येष्ठ अधिकारी जे. ए. शेख,  सहायक पोलीस निरीक्षक संदीप पोमण, पोलीस उपनिरीक्षक संदीप निकाळजे, पोलीस उप निरीक्षक अमित देशभुख यांच्यासह इतर कर्मचाऱ्यांनी ही कारवाई केली.

Published by: Ajay Kautikwar
First published: October 7, 2020, 11:13 PM IST
Tags:

ताज्या बातम्या