मराठा आरक्षणाबाबतचा एटीआर आज विधीमंडळात होणार सादर

याआधी पुन्हा एकदा उपसमितीची बैठक पार पडणार आहे.

News18 Lokmat | Updated On: Nov 29, 2018 09:47 AM IST

मराठा आरक्षणाबाबतचा एटीआर आज विधीमंडळात होणार सादर

मुंबई, 29 नोव्हेंबर : मराठा आरक्षणासाठी आजचा दिवस महत्त्वाचा असणार आहे.  आज सकाळी साडे दहा वाजता मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडल्यानंतर विधीमंडळात मराठा आरक्षणाचा एटीआर आणि विधेयक मांडलं जाणार आहे.


बुधवारी रात्री मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक पार पडली. या  बैठकीनंतर जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांनी उद्या विधीमंडळात एटीआर आणि विधेयक मांडलं जाणार असल्याची माहिती दिली. याआधी पुन्हा एकदा उपसमितीची बैठक पार पडणार आहे. त्यामुळं एटीआर आणि विधेयकामध्ये मराठा आरक्षणासाठी काय तरतूद करण्यात आली आहे याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.


दरम्यान,मराठा समाजाला १६ टक्के आरक्षण देण्यावर उपसमितीच्या बैठकीत चर्चा झाल्याचं कळतंय. बुधवारी अधिवेशनाच्या आधी याबद्दल चर्चा करून निर्णय घेतला जाईल अशी माहिती उपसमितीचे नेते एकनाथ शिंदे यांनी मंगळवारी दिली होती.

Loading...


शिवसेनेचा पाठिंबा


मराठा आरक्षणासाठी विधेयक मांडण्यावर सरकार ठाम आहे. मंगळवारी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी संध्याकाळी 'मातोश्री'कडे धाव घेतली. उद्धव ठाकरे यांच्यासोबत जवळपास अर्धातास त्यांनी चर्चा केली.  शिवसेना मराठा आरक्षण विधेयकाला पाठिंबा देईल अशी माहिती पाटील यांनी दिली.


'काळजी घेऊन आरक्षण द्या'


तर न्यूज१८ लोकमतशी बोलताना छगन भुजबळ यांनी मराठा आरक्षण देण्यावर चिंता व्यक्त केली. राज्यात 50 टक्केची मर्यादा ओलांडून 52 टक्के आरक्षण आहे. हे वरील दोन टक्के आरक्षण गोवारी आणि कोष्टी समाजाला देण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तो कोर्टाने मान्य केलेला नाही. त्यामुळे ते ओबीसीमध्ये आले. त्यामुळे ओबीसींचे आरक्षण 19 टक्क्यांवरून 17 टक्के आले आता मराठा समाजाला आरक्षण दिले तर ते ओबीसीमध्ये येणार आहे. त्यामुळे सरकारने आरक्षण देताना काळजी घ्यावी असं मी विधानसभेत सांगितलं असं भुजबळ म्हणाले.


मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याची काळजी घेतली पाहिजे नाहीतर मराठा समाजालाही काही भेटणार नाही आणि ओबीसी समाजालाही काही भेटणार नाही अशी चिंताही भुजबळांनी व्यक्त केली.


==================

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 28, 2018 10:47 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...