पळून जाऊन लग्नांचं प्रमाण वाढलं, मुलीच्या लग्नाचं वय 21 करा, भाजप खासदाराची मागणी

पळून जाऊन लग्नांचं प्रमाण वाढलं, मुलीच्या लग्नाचं वय 21 करा, भाजप खासदाराची मागणी

कायद्याच्या बंधनामुळे वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पालकांच्या संमतीविना पळून जाऊन लग्न करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

  • Share this:

08 मार्च : पालकांच्या संमतीशिवाय मुलीच्या लग्नाचं वय 21 करा अशी मागणी करणारं खासगी विधेयक मुंबईतले भाजप खासदार गोपाळ शेट्टी यांनी सादर केलंय.

हे विधेयक सादर करताना गोपाळ शेट्टी यांनी दिलेलं कारणही थोडं वेगळंच आहे. कायद्याच्या बंधनामुळे वयाची १८ वर्षे पूर्ण झाल्यानंतर पालकांच्या संमतीविना पळून जाऊन लग्न करण्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

मात्र, बऱ्याचदा अजाणतेपणाने मुली असे धाडसी निर्णय घेतात आणि चुकतात. लग्न हा आयुष्याचा प्रश्न असल्याने अशा चुका टाळण्यासाठी पालकांच्या संमतीने जर मुलींचे लग्न होत असेल ते वयाच्या १८व्या वर्षी करण्यास हरकत नाही.

मात्र, पालकांच्या संमतीशिवाय मुली पळून जाऊन लग्न करणार असतील तर त्यांना वयाची अट २१ वर्षे असावी अशी मागणी खासदार शेट्टी यांनी केली आहे.

First published: March 8, 2018, 10:18 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading