मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

कापड व्यापाऱ्याच्या मुलाच्या अपहरण नाट्याचा 24 तासांत उलगडा, समोर आलं ते भयंकर!

कापड व्यापाऱ्याच्या मुलाच्या अपहरण नाट्याचा 24 तासांत उलगडा, समोर आलं ते भयंकर!

 मुलुंड पोलिसांनी एका व्यापाऱ्याच्या मुलाचं झालेलं अपहरण नाट्य अवघ्या 24 तासांत उलगडत 4 आरोपींना पुण्यातून अटक केली.

मुलुंड पोलिसांनी एका व्यापाऱ्याच्या मुलाचं झालेलं अपहरण नाट्य अवघ्या 24 तासांत उलगडत 4 आरोपींना पुण्यातून अटक केली.

मुलुंड पोलिसांनी एका व्यापाऱ्याच्या मुलाचं झालेलं अपहरण नाट्य अवघ्या 24 तासांत उलगडत 4 आरोपींना पुण्यातून अटक केली.

मुंबई, 6 सप्टेंबर: मुलुंड पोलिसांनी एका व्यापाऱ्याच्या मुलाचं झालेलं अपहरण नाट्य अवघ्या 24 तासांत उलगडत 4 आरोपींना पुण्यातून अटक केली. उसणवारीत दिलेले 5 लाख रुपये परत न केल्यानं व्यापाऱ्यांच्या मुलाचं अपहरण करण्यात आलं होतं, अशी धक्कादायक माहिती उजेडात आली आहे.

हेही वाचा...मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना दाऊद गँगची धमकी? मातोश्रीची सुरक्षा वाढवली

मुलुंडमध्ये राहणारे व्यापारी राजेश लालन यांचा कापडाचा व्यवसाय आहे. राजेश यांचा मुलागा विरल हा देखील आपल्या वडिलांना व्यवसायात मदत करतो. मात, विरल याने कापड व्यवसायात मार्केटिंगचे काम करणारे रोहित बाबासाहेब घारे, महेश नारायण जोंधळे, रोहन कुमार गराडे आणि आकाश लक्ष्मण करंजावणे यांच्याकडून 5 लाख रुपये उधार घेतले होते. संबंधित लोक विरलकडे वारंवार पैशांची मागणी करत होते. मात्र, कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन असल्याने आपल्याकडे पैसे नाहीत. पैसे आल्यानंतर देतो असं विरल सांगत होता. मात्र, आरोपी काहीही ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. त्यामुळे चारही जणांनी विरल याच्याच अपहरणाचा कट रचला. विरल याचं अपहरण करून त्याच्या कुटुंबियांकडून पैसे मागण्याचा प्लान आरोपींनी केला.

आरोपी रोहित आणि महेशने विरल याला अंधेरीला कामानिमित्त बोलावून घेतलं. त्याला गाडीत टाकून पुण्याच्या दिशेने निघाले. विशेष म्हणजे ही कार अपहृत विरल याचीच होती. पुण्याला जात असताना रस्त्यात त्यांना रोहन आणि आकाश हे दोघे भेटले. त्यांनी विरलचे वडील राजेश लालन यांना फोन करून पैसे देण्याची मागणी केली. पैसे मिळाले नाही तर मुलाला मारून टाकण्याची धमकीही दिली.

धमकीचा फोन येताच राजेश यांनी याबाबत मुलुंड पोलीस ठाण्यात तक्रार केली. अप्पर पोलीस आयुक्त संजय दराडे यांनी या तक्रारीची गंभीर दखल घेतली. उपायुक्त प्रशांत कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी पथके तयार करून तांत्रिक माहितीच्या मदतीनं या आरोपींचा पाठलाग केला आणि पुण्यातून त्यांना ताब्यात घेतले. सुदैवानं विरल हा देखील सुरक्षित होता.

हेही वाचा...शरद पवारांच्या गाडीचं स्टिअरिंग आणखी एका नातवाच्या हाती... पाहा VIDEO

मुलुंड पोलिसांनी अवघ्या 24 तासांत या अपहरणाचा छडा लावून चारही आरोपींना अटक केली. तसेच कार सुद्धा जप्त केली, अशी माहिती अप्पर पोलीस आयुक्त पूर्व प्रादेशिक विभाग संजय दराडे यांनी दिली आहे.

First published:

Tags: Mumbai police