27 जून : ११ वी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेची मुदत दोन दिवसांसाठी वाढवण्यात आली आहे. २९ जूनपर्यंत संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंत विद्यार्थ्यांना अर्ज करता येणार आहे.
मुंबई,अमरावती तसंच अन्य भागातील विद्यार्थांना प्रवेशा सोयीचे व्हावे म्हणून हा निर्णय घेण्यात आलाय. तसंच २९ जून, २०१७ नंतर विद्यार्थ्यांना ऑनलाईन प्रक्रियेमध्ये अर्ज भरता येणार नाही, असं शिक्षण उपसंचालकांनी एका निवेदनाच्या माध्यमातून स्पष्ट केलंय.
ऑनलाईन प्रवेश अर्ज भरण्याची मुदत आज संध्याकाळी ५ वाजेपर्यंत ठेवण्यात आली होती, ही मुदत दोन दिवसांसाठी वाढवून २९ जून, २०१७ रोजी सायंकाळी ५ वाजेपर्यंत करण्यात आली आहे. http://mumbai.11thadmission.net/ या वेबसाईटवर अकरावीची ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया होणार आहे. दोन टप्प्यात ही अॅडमिशनची प्रक्रिया पार पडणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.