मुंबई, 01 नोव्हेंबर : मुंबईतील ड्रग्स पार्टी प्रकरणावरून राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांनी भाजपचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यावर आणि त्यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांच्यावर गंभीर आरोप केला होता. 'मुंबईतील नद्यांसाठी जे गाणं तयार करण्यात आलं होतं, ते गाणं मोफत करण्यात आले होते' असा दावा अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी केला आहे.
नवाब मलिक यांच्या आरोपानंतर अमृता फडणवीस यांनी पहिल्यांदाच पत्रकार परिषद घेऊन आरोपांना उत्तर दिले आहे.
'रिव्हर मार्च फाऊंडेशनची लोक माझ्याकडे आली होती. त्यांनी मला नद्यांचं प्रदूषण रोखण्यासाठी समजावून सांगितले होते. मी स्वत: मुंबईला ज्या चार नद्या आहे, त्यांची पाहणी केली होती. नद्यांमध्ये सांडपाणी, प्राण्याचे अवयव इतर गोष्टी आढळून आल्या आहेत. मी राजकारणी नसून समाजसेविका आहे, त्यातून नद्या प्रदूषण मुक्त करण्यासाठी काम सुरू केला, असं अमृता फडणवीस यांनी सांगितलं.
रोहित तिसऱ्या क्रमांकावर का आला? टीम इंडियातली धक्कादायक Inside Story
'रिव्हर मार्च फॉऊंडेशनसोबत जोडले गेले. त्यानंतर या फाऊंडेशनने गाण्यासाठी एक संस्थेला आऊटसोर्स केलं होतं. यात सचिन गुप्ता आणि जयदीप राणा हे दोघे होते. यांनी दोघांनी जगदीश वासूदेव यांच्यासाठी एक गाणं तयार केलं. 'ओ नदी नदीया' हे गाणं तयार केलं. त्यावेळी आम्ही त्यामध्ये गाणं म्हटलं. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा गाणं म्हटलं, अनेक सेलिब्रिटींनी गाणं म्हटलं. आम्हाला त्यांचं काम पाहून खूप आवडलं. रिव्हर मार्चवाल्यांना, त्यांनी सुद्धा मुंबईसाठी एक गाणं तयार करावं अशी विनंती केली. त्यानंतर सचिन गुप्ता यांनी आम्हाला मोफत गाणं तयार करून दिलं. रिव्हर मार्चने मोफत काम करण्यासाठी आले. त्यांनी वेळ आणि पैशाची परवा न करता मोफत गाणं तयार करून दिलं. त्यांनी एक पैसा सुद्धा आमच्याकडून घेतला नाही' असा खुलासा त्यांनी केला.
पण आज सामजिक कार्यकर्त्यांच्या पाठीमागे ही लोक लागली आहे. तुम्हाला जे राजकारण करायचे असेल, बिगडे नबाव व्हायचे असेल तर तुम्ही तुमची प्रतिमा सुधारा नाहीतर महाराष्ट्राचं काही खरं नाही, अशी टीकाही त्यांनी केली.
'रॅली फॉर रिव्हर मार्च ग्रुप आहे, त्यांना मीच देवेंद्र फडणवीस यांच्याकडे घेऊन आली होती. आम्ही दोघेही वेगवेगळे आहोत. मी एक सामाजिक कार्यकर्ती आहे. बँकर, गायिका आहे, जर माझ्या अंगावर कुणी आलं तर मी त्याला सोडणार नाही. मी खऱ्याची साथ कधी सोडत नाही, आणि खोट्याला साथ देणाऱ्यांना सोडत नाही, असा इशाराही अमृता फडणवीस यांनी दिला.
खूशखबर! रिलायन्स इंडस्ट्रीजचं Jio Drive-in theatre 'या' तारखेपासून होणार सुरु
'रिव्हर मार्च संस्थेला तो ड्रग्समध्ये अडकलेला माहिती नसेल. त्यामुळे त्यांनी त्याचं नाव काढून टाकलं आहे' असंही अमृता फडणवीस म्हणाल्या.
माझ्यावर जाणिवपूर्वक आरोप केले जात आहे. आमच्याकडे ना जमिनी आहे, ना साखर कारखाने आहे, त्यामुळे असे आरोप केले जात आहे. बे नकाब नवाब होता हे ते जरूर होतील पण ही वेळेची गोष्ट आहे. काही सूचत नाही, माणसाच्या डोक्यात जेव्हा वाईट विचार येतात त्यामुळे ते असे आरोप करत आहे, अशी टीकाही फडणवीस यांनी मलिक यांच्यावर केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Nawab malik, NCP