ठाण्यातल्या दिडशे वर्षांच्या कृष्ण मंदिरात दरोडा; 50 लाखाचे दागिने लंपास

ठाण्यातल्या दिडशे वर्षांच्या कृष्ण मंदिरात दरोडा; 50 लाखाचे दागिने लंपास

सकाळी ७.३० च्या दरम्यान चोरट्यांनी मागच्या बाजूने लोखंडी रेलिंग आणि लोखंडी दरवाजा तोडून मंदीरात प्रवेश केला.

  • Share this:

ठाणे, 2 ऑगस्ट : गोकुळाष्टमीच्या आदल्या दिवशीच ठाण्यात एक घटना घडलीये. जांभळी नाका परिसरातील 150 वर्ष जुन्या कृष्ण मंदिरात दरोडा पडलाय. चोरट्यांनी मंदिराती 50 लाखाचे दागिने लंपास केले. रविवारी सकाळी 7.30च्या दरम्यान चोरट्यांनी मागच्या बाजूने असलेले लोखंडी रेलिंग आणि लोखंडी दरवाजा तोडून मंदीरात प्रवेश केला. विशेष बाब म्हणजे मंदिराच्या मागील भागात सिसिटीव्हि कॅमेरे नसल्याने, पोलिसांसमोर मोठं आव्हान उभं राहिलं आहे.

ठाण्यातल्या जांभळी नाका परिसरात पेढ्या मारुती मंदीराजवळ दिडशे वर्ष पुरातन श्रीकृष्ण मंदीर आहे. "कृष्णाची हवेली" या नावाने सुद्धा हे मंदिर प्रसिद्ध आहे. गोकुळाष्टमीच्या आदल्या दिवशी चोरट्यांनी या मंदिरात हात साफ केला. रविवारी सकाळी 7.30 च्या दरम्यान चोरट्यांनी मंदीराच्या मागच्या बाजूने असलेल्या दरवाजातून आत प्रवेश केला. त्यासाठी त्यानी लोखंडी रेलिंग आणि लोखंडी दरवाजाही तोडला.

धक्कादायक म्हणजे सकाळी 7.30 च्या दरम्यान ही घडना घडल्याने आश्चर्य व्यक्त केल्या जात आहे. मंदिराच्या मागील बाजूस सिसिटीव्हि कॅमेरे नाहीत, याची माहिती चोरांना असल्यानेच त्यांनी मागील दरवाजा तोडून आत प्रवेश मिळवला आणि चोरी केली.

PHOTO : गोविंदा आला रे... या आहेत मुंबईतल्या प्रसिद्ध दहीहंड्या

First published: September 2, 2018, 9:19 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading