Home /News /mumbai /

कौतुकास्पद! नालेसफाईची पाहणी करण्यासाठी महिला अधिकारी थेट उतरल्या मॅनहोलमध्ये

कौतुकास्पद! नालेसफाईची पाहणी करण्यासाठी महिला अधिकारी थेट उतरल्या मॅनहोलमध्ये

व्हिडिओमध्ये त्या स्वतः शिडीच्या मदतीने मॅनहोलमध्ये तपासणी करण्यासाठी उतरत असल्याचं दिसत आहे. भिवंडी-निजामपूर महानगर पालिकेच्या या महिला अधिकारी आहेत.

    ठाणे, 08 जून : कर्तव्याप्रती असलेली निष्ठा हेच कोणत्याही प्रशासकीय अधिकाऱ्याचं सर्वात मोठं शस्त्र असल्याचं म्हटलं जातं. मात्र अनेकदा प्रशासनातील कर्मचारी आणि अधिकाऱ्यांबद्दल अनेकदा तक्रारी समोर येत असताना. कामात टाळाटाळ करण्याचे आरोप होत असतात. मात्र याला अनेक अधिकारी अपवादही ठरत असतात. आपलं कर्तव्य कसं पार पाडायचं हे या अधिकाऱ्यांना चांगलंच ठाऊक असतं. अशाच एक महिला अधिकारी (Woman Officer) सध्या कौतुकास पात्र ठरल्या आहेत. (वाचा-पंतप्रधान पद अडीच-अडीच वर्षे असा निर्णय तर झाला नाही ना? संदीप देशपांडेंचा चिमटा) मान्सूनची चाहूल लागल्यानं सगळकडं विविध प्रकारच्या कामांना सुरुवात झाली आहे. महानगरपालिकांमध्ये पावसाच्या तोंडावर नालेसफाई हा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा असतो. कारण पावसाळ्यात अनेकठिकाणी पाणी साचण्याच्या अडचणी निर्माण होत असतात. नालेसफाई चांगल्या पद्धतीनं झालेली असेल, तर पाणी साचण्याची समस्या बऱ्याच अंशी कमी होते. ठाणे जिल्ह्यामध्ये अशाच नाले सफाईच्या कामाची पाहणी करण्यासाठी स्वच्छता निरीक्षक (Cleaning inspector) असलेल्या महिला अधिकारी थेट मॅनहोलमध्ये (Manhole) उतरल्या. ठेकेदाराला सोपवण्यात आलेलं काम त्यानं योग्यरित्या केलं आहे का, हे तपासण्यासाठी सुविधा चव्हाण या अधिकारी थेट मॅनहोलमध्ये उतरल्या आणि त्यांनी कामाची पाहणी केली. त्यांच्या या कर्तव्यनिष्ठेबद्दल त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. (वाचा-ठाकरे-मोदी भेट म्हणजे, 'आपण एकत्र येऊया, पुन्हा लग्न लावुया', उदयनराजेंचा आरोप) महिला अधिकारी सुविधा चव्हाण यांचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये त्या स्वतः शिडीच्या मदतीने मॅनहोलमध्ये तपासणी करण्यासाठी उतरत असल्याचं दिसत आहे. भिवंडी-निजामपूर महानगर पालिकेच्या या महिला अधिकारी आहेत. सुविधा चव्हाण या भिवंडी शहरात विविध नाल्यांच्या सफाईच्या आणि गाळ तसेच घाण काढण्याच्या कामाची पाहणी करत होत्या. दरवर्षी पावसाळ्यामध्ये नाल्यांमध्ये घाण अडकून रस्त्यावरील पाणी वाहून न गेल्यानं अनेक ठिकाण पाणी साचतं. त्यामुळं अशी समसया येऊ नये म्हणून या कामाची तपासणी केली जात होती. त्यावेळी सुविधा यांनी कर्तव्यनिष्ठपणाचं उत्तम उदाहरण सादर केलं.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Maharashtra News, Monsoon, Thane

    पुढील बातम्या