ठाण्यातील तीन टाकी सिद्धेश्वर तलाव परिसरात पाईप लाइन फुटली

ठाण्यातील तीन टाकी सिद्धेश्वर तलाव परिसरात पाईप लाइन फुटली

महापालिकेच्या निकृष्ट कामामुळे आज परत पाईप लाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले

  • Share this:

ठाणे, ०५ सप्टेंबर- ठाण्यातील सिद्धेश्वर तलाव परिसरातील पाण्याची टाकी रात्री 10 च्या सुमारास अचानक फुटली. एका महिन्यापूर्वी याच टाकीचा पाईप फुटला होता. अचानक टाकी फुटल्याने लाखो लिटर पाणी वाया गेले. दरम्यान हे पाणी आजूबाजूच्या घरामध्ये शिरल्याने नागरिकांच्या घरातील सामानाचे नुकसान झाले आहे. याआधीही या टाकीचा पाईप फुटला होता. या परिसरात तीन टाक्या आहेत आणि या टाक्या २०  वर्ष जुन्या आहेत. या टाक्यांकडे महापालिकेचे दुर्लक्ष असल्यामुळे आणि महापालिकेच्या निकृष्ट कामामुळे आज परत पाईप लाईन फुटून लाखो लिटर पाणी वाया गेले आहे. स्थानिकांचे म्हणणे आहे.

VIDEO : 'मी पुलाखाली अडकलो, तुम्ही मला ओळखता का?'

First published: September 5, 2018, 7:30 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading