BREAKING : ठाणे - ऐरोलीदरम्यान लोकलचे डबे घसरले, ट्रान्सहार्बर ठप्प

ठाणे ते ऐरोली दरम्यान लोकलचे 3 डबे घसरल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. ट्रान्सहार्बर लाईन यामुळे पूर्णपणे बंद पडली आहे.

News18 Lokmat | Updated On: Aug 11, 2019 08:09 PM IST

BREAKING : ठाणे - ऐरोलीदरम्यान लोकलचे डबे घसरले, ट्रान्सहार्बर ठप्प

मुंबई, 11 ऑगस्ट :  ठाणे- वाशी वाहतूक गेल्या काही काळापासून ठप्प झाली आहे. ठाणे ते ऐरोली दरम्यान लोकलचे 3 डबे घसरल्याची प्राथमिक माहिती हाती आली आहे. ट्रान्सहार्बर लाईन यामुळे पूर्णपणे बंद पडली आहे. ठाणे ते नेरूळ लोकलचे शेवटचे तीन डबे रुळांवरून घसरले. यामुळे ठाण्याकडून नवी मुंबईच्या दिशेला जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे.

ठाणे ते ऐरोली दरम्यान हे डबे घसरल्यानं या मार्गावरची सगळी वाहतूक बंद आहे. ठाणे ते पनवेल, ठाणे ते वाशी आणि ठाणे बेलापूर लोकलसेवा यामुळे बंद आहे. या दुर्घटनेत कुणी जखमी झाल्याचं किंवा जीवितहानीचं वृत्त नाही. लोकलचे डबे नेमके कोणत्या कारणाने घसरले याविषयी अद्याप माहिती हाती आलेली नाही. सविस्तर बातमी लवकरच..

--------------------

VIDEO : 'त्या' बचावामागची खरी कहाणी; 'तो' माणूस 3 दिवस तराफ्यावर होता बसून

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 11, 2019 07:56 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...