ठाण्यात स्वप्नाली लाड प्रकरणाची पुनरावृत्ती, अतिप्रसंगानंतर तरूणीला रिक्षातून फेकलं

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Jun 9, 2017 09:52 AM IST

ठाण्यात स्वप्नाली लाड प्रकरणाची पुनरावृत्ती, अतिप्रसंगानंतर तरूणीला रिक्षातून फेकलं

09 जून : ठाण्यात स्वप्नाली लाड प्रकरणाची पुनरावृत्ती घडल्याने पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. ठाण्याच्या तीन हात नाका परिसरातून शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्या तरुणीवर सहप्रवाशाने रिक्षाचालकाच्या साथीनेच अतिप्रसंग केल्याचा आरोप होत आहे.

बुधवारी रात्री साडेनऊच्या सुमारास 23 वर्षीय तरुणी शेअर रिक्षाने चितळसर मानपाडा येथे घरी निघाली होती. तीन हात नाका परिसरात ती बसली तेव्हा रिक्षात एकच सहप्रवासी होता. रिक्षा चालकाने अन्य प्रवासी न घेता रिक्षा सुसाट नेली.

रिक्षा चितळसर मानपाडाकडे नेण्याऐवजी पोखरण रोडकडे नेल्याने तरुणी सावध झाली. सहप्रवाशाने रिक्षा चालकाच्या संगनमताने तरुणीवर धावत्या रिक्षातच जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केला. अचानक घडलेल्या

प्रकारामुळे तरुणीने बचावासाठी आरडाओरड केली.

तरुणीच्या प्रतिकारानंतर आरोपीसह प्रवाशाने तिला गप्प करण्यासाठी मारहाणही केली. मात्र आरडाओरड सुरुच राहिल्याने रिक्षा चालक आणि सह प्रवाशी यांनी तरुणीला वर्तकनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोखरण रोडवरील एका कंपनीजवळ निर्जनस्थळी नेऊन रिक्षातून फेकलं आणि रिक्षा सुसाट नेली.

Loading...

या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात अज्ञात रिक्षाचालक आणि सहप्रवाशाविरोधात अपहरण आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरुणीवर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू असून तिची प्रकृती ठीक आहे. तिच्या तोंडाला गंभीर इजा झाल्याची माहिती आहे.

ठाण्यात रिक्षाचालकानेच प्रवासी तरुणीवर अतिप्रसंग केल्याची घटना दोन वर्षांपूर्वी घडली होती. यावर ठाणे पोलिस आणि वाहतूक पोलिस विभाग यांनी अनेक उपाययोजना केल्यानंतरही पुन्हा दोन वर्षाने ठाण्यात शेअर रिक्षाने प्रवास करणाऱ्या एकट्या महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.

ठाण्यात महिल्यांची सुरक्षा ऐरणीवर

2014 : स्वप्नाली लाड या तरुणीचे रिक्षातून अपहरण करण्याचा प्रयत्न केला

जीव वाचवण्यासाठी तिने रिक्षातून उडी मारली आणि ती गंभीर जखमी झाली

2015 : कापूरबावडी येथे रिक्षात बसलेल्या दोन तरुणींना पाहून अश्लिल हावभाव केले

यामुळे त्या तरुणींनी रिक्षातून उडी मारली

2017 : या दोन घटना समोर असताना एक तरुणीसोबत रिक्षा चालकाने विनयभंग करण्याच प्रयत्न केला

घाबरलेल्या तरुणीनं आरडाओरडा केल्यानंतर, तिला रिक्षेतून पोखरड रोडवर निर्जन स्थळी फेकून दिलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jun 9, 2017 09:23 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...