सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरीला गेलेले बाळ सापडले, ठाणे गुन्हे शाखेला यश

सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरीला गेलेले बाळ सापडले, ठाणे गुन्हे शाखेला यश

सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरीला गेलेले बाळ शोधून काढण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. पोलिसांनी बाळासह तिघांना डोंबिवलीमधून ताब्यात घेतले.

  • Share this:

ठाणे, 15 जानेवारी : सिव्हिल हॉस्पिटलमधून चोरीला गेलेले बाळ शोधून काढण्यात ठाणे गुन्हे शाखेला यश मिळाले आहे. पोलिसांनी बाळासह तिघांना  डोंबिवलीमधून ताब्यात घेतले.

ठाण्यातल्या सिव्हिल रुग्णालयात बाळ जन्माला येऊन सहा तासही लोटले नाही तोच बाळाची चोरी झाली आहे होती. बाळ चोरणाऱ्या महिलेचा चेहरा रुग्णालयातल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यात रेकॉर्ड झाला होता. विशेष म्हणजे एक महिला चोरी करून मुख्य प्रवेश द्वारातून जाताना चक्क या सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसत आहे त्यामुळे सिव्हील रुग्णालयाची सुरक्षा कशी बेभरावश्याची आहे हेच यातून सिद्ध होत आहे.

दरम्यान या घटनेमुळं ठाणे सिव्हिल रुग्णालय प्रशासनाचा भोंगळा कारभार चव्हाट्यावर आला आहे. भिवंडीमध्ये राहणाऱ्या मोहिनी भुवर यांना प्रसुतीसाठी ठाण्याच्या सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांनी एका गोंडस बाळाला जन्म दिला. मात्र आई झाल्याचा आनंद साजरा करण्यापूर्वीच त्यांचं बाळ चोरीला गेलं होतं.

या आधीही याच जिल्हा रुग्णालयात अनेक चोरी आणि हानामारीचे प्रकार उघडकीस आले होते. पण गुन्हे कमी होते की काय म्हणत आता बाळ चोरीच्या प्रकाराचीही यात भर पडली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 15, 2018 09:08 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading