ठाणे पोलिसांची गुंडगिरी, बारमध्ये घुसून मालकाला मारहाण

ठाण्यातील श्रीनगर भागात असलेल्या एका बारच्या व्यवस्थापकाला बारमध्ये घुसून मारहाण करण्यात आलेली आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Nov 9, 2017 08:27 PM IST

ठाणे पोलिसांची गुंडगिरी, बारमध्ये घुसून मालकाला मारहाण

09 नोव्हेंबर : ठाणे पोलिसांची पुन्हा एकदा गुंडागर्दी सीसीटीव्हीमध्ये कैद झाली आहे. ठाण्यातील श्रीनगर भागात असलेल्या एका बारच्या व्यवस्थापकाला बारमध्ये घुसून मारहाण करण्यात आलेली आहे.

ठाण्यातील श्रीनगरमधील श्रेया बारमध्ये बार बंद करण्याच्या वेळी पोलीस घुसले आणि व्यवस्थापकाला पोलीस निरीक्षक अशोक सायकर यांनी मारहाण केली. या मारहाणीनंतर तुम्हाला ठार मारून गायब करण्याची धमकी ही या वेळी दिल्याचा आरोप सायकर यांच्यावर व्यवस्थापकाने केला आहे. मुंबई ठाण्यातील हॉटेल रात्री दीड वाजेपर्यंत चालू ठेवण्याची परवानगी असताना हॉटेलमध्ये जाणूनबुजून घुसून केलेली मारहाण ही कायद्याचा भंग असून झालेल्या मारहाणीच्या विरोधात श्रीनगर पोलिसांसह ठाणे पोलीस आयुक्त परमबीर सिंघ यांना ठाण्यातील हॉटेल व्यवसाय संगघनेनं दोषी अधिकाऱ्यांवर कारवाईची मागणी केली आहे या बाबत पोलिसांनी कोणतेही प्रतिक्रिया दिली नसून पोलिसांकडून विभागीय चौकशी सुरू असल्याचं सांगण्यात आलंय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Nov 9, 2017 08:27 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...