मुंबईत मोबाईल चोरून बांग्लादेशात विकणारी टोळी गजाआड, असा रचला सापळा

आलमकडून पोलिसांनी एक गावठी कट्टाही हस्तगत केलाय. ही टोळी झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये वास्तव्य करणारी आहे.

News18 Lokmat | Updated On: Jul 17, 2019 09:33 PM IST

मुंबईत मोबाईल चोरून बांग्लादेशात विकणारी टोळी गजाआड, असा रचला सापळा

प्रदीप भणगे, कल्याण 17 जुलै : मुंबई आणि परिसरात तब्बल दीड कोटी रुपयांचे मोबाईल चोरणाऱ्या एका अट्टल चोरट्याला ठाणे गुन्हे शाखेच्या कल्याण युनिटने बेड्या ठोकल्या. डोंबिवलीतल्या एका दुकानात चोरी करण्याच्या तयारीत असतानाच पोलिसांनी ही कारवाई केली. या चोरांची एक टोळी असून अशा चोऱ्या करून चोरलेले मोबाईल ही टोळी बांग्लादेशात विकत असल्याचं स्पष्ट झालं.पोलिसांनी दोन जणांना अटक केली असून चार जण फरार आहेत.

आलम शेख असं या चोरट्याचं नाव असून तो मुंबई आणि उपनगरात मोठ्या मोबाईल दुकानांना लक्ष्य करत होता. काही महिन्यांपूर्वी त्याने मुंबईतल्या पश्चिम उपनगरात एका मोबाईल शॉपमध्ये भिंतीला भगदाड पाडून जवळपास एक कोटी रुपयांचे मोबाईल चोरले होते, तर कल्याणच्या एका मोबाईल शॉपमध्येही त्याने अशाच पद्धतीने लाखो रुपयांचे मोबाईल चोरले होते. तेव्हापासून पोलीस त्याच्या मागावर होती.

माता न तू वैरिणी! स्वराच्या हत्येला धक्कादायक वळण, जन्मदात्या आईनेच घेतला जीव

तो अट्टल मोबाईल चोर डोंबिवलीत येणार असल्याची माहिती खबऱ्यांनी पोलिसांना दिली होती. तो एका दुकानात चोरी करण्यासाठी येणार असल्याची माहिती कल्याण गुन्हे शाखेला मिळाली. त्यानुसार सापळा रचून पोलिसांनी आलम आणि त्याच्या एका साथीदाराला अटक केली, तर इतर चार चोरटे पळून जाण्यात यशस्वी झाले.

आलमकडून पोलिसांनी एक गावठी कट्टाही हस्तगत केलाय. ही टोळी झारखंड आणि पश्चिम बंगालमध्ये वास्तव्य करणारी असून चोरलेले मोबाईल थेट बांग्लादेशात विकण्यात येत असल्याची माहिती पोलिसांनी दिलीय.

Loading...

परतीच्या वाटेवर असलेल्या वारकऱ्यांच्या ट्रकला अपघात, 13 जण जखमी

पुलाखाली सापडला मृतदेह

नांदेड - पुलाखालील पाईपमध्ये एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली. नांदेड जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील तडखेल येथे ही घटना समोर आली आहे. 18 ते 20 वयोगटातील तरुणीचा हा मृतदेह आहे. पोलिसांनी मृतदेह उत्तरीय तपासासाठी शासकीय रुग्णालयात पाठवला आहे. या हत्येमागील कारण अद्याप अस्पष्ट आहे.

न्हाव्याने कापल्या युवा दणका संघटनेच्या अध्यक्षाच्या मिशा, नागपुरात गुन्हा दाखल

मिळालेली माहिती अशी की, देगलूर तालुक्यातील तडखेल गावाशेजारील पुलाखालील पाईपमध्ये बुधवारी एका तरुणीचा जळालेल्या अवस्थेतील मृतदेह गावकऱ्यांना आढळून आला. पोलिसांना याबाबत तात्काळ माहिती देण्यात आली. तरुणीसोबत घातपात करुन पुरावा नष्ट करण्याचा हेतूने तिच्या अंगावर पेट्रोल टाकून तिला जाळण्यात आले आहे. चेहरा ओळखू येऊ नये, यासाठी चेहऱ्यावर पेट्रोल टाकून जाळण्यात आला आहे. सदर तरुणी ही अंदाजे 18 ते 20 वयोगटातील आहे. तरुणीची ओळख अद्याप पटली नसून पुढील तपासणीसाठी तिचा मृतदेह शासकीय रुग्णालयात पाठवण्यात आला आहे. शवविच्छेदनाचा अहवाल आल्यानंतर अधिक माहिती समोर येईल, असे पोलिसांनी सांगितले आहे. 18 ते 20 वयोगटातील तरुणी हरवली असल्यास देगलूर पोलिसांशी संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या घटनेने मात्र देगलूर तालुक्यात प्रचंड खळबळ उडाली आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 17, 2019 09:28 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...