अजित मांढरे, प्रतिनिधी ठाणे, 04 मार्च : ठाणे पोलिसांच्या वर्तकनगर पोलिसांनी अशा एका चोराला अटक केलीये जो कोणत्याही गाडीचा वापर न करता महिलांच्या गळ्यातील सोन्याचे मंगळसूत्र खेचून क्षणार्धात गायब व्हाययचा. या चोराच्या अटकेमुळे मंगळसूत्र चोरीची एक नवीन मोडस ॲापरेंडी समोर आली आहे. तर या चोराच्या अटकेमुळे ठाण्यातील अनेक मंगळसूत्र चोरीचे गुन्हे उघडकीस येणार आहे.
मंगळसूत्र चोरी म्हणजे धूम स्टाईल गाडीवरुन येऊन महिलांच्या गळ्यांतील सोन्याचे दागिने खेचून धूम ठोकणे. असे मंगळसूत्र चोरीचे प्रकार आपण पाहिले असतील किंवा ऐकले असतील दुर्दैवाने आपल्या सोबत घडले ही असतील. सोन्याच्या किंमती रोज गगनाला भिडतायेत. १ तोळे सोन्या करता ४० हजार रुपयांपेक्षा ही जास्त पैसे मोजावे लागतात. आणि आपल्या इथे महिलांच्या गळ्यात किमान १ तोळे सोन्याचा दागिना असतोच... याचाच फायदा घेत धूम स्टाईल महिल्यांच्या गळ्यातील दागिने चोरण्याचे प्रकार घडतात. पण गाडीचा वापर न करता महिलांच्या गळ्यातून दागिने चोरुन क्षणात चोर गायब होतो असे प्रकार ठाण्यात घडत होते.
खरंतर गेल्या काही दिवसांत ठाण्यातील अनेक पोलीस स्टेशन मध्ये महिला गळ्यातील दागिने चोरल्याची तक्रार करायला यायच्या पण चोर गाडीवरुन न येता चालत आला आणि चोरीकरुन डोळ्या समोरच गायब झाला अशा तक्रारींवर पोलिसांचाही विश्वास बसत नव्हता. कारण गाडीचा वापर न करता महिलांच्या गळ्यातील दागिने चोरणारा चोर हा प्रकार
पोलिसांकरता ही नवीनच होता.
पोलिसांच्या अटकेत असलेला या बुरखाधारी २८ वर्षीय तरुणाचे नाव आहे मिलिंद सुतार. जेमतेम शिक्षण घेतलेल्या बेरोजगार मिलिंदला महागड्या लाईफ स्टाईलची चटक लागली होती. याकरता त्याने ठाण्यात अनेक ठिकाणी छोटी मोठी कामे केलीयेत मात्र त्याला पैसे कमीच पडत असल्याने तो चोरी करू लागला. चोरीकरता त्याने ठाणे शहरातील गल्ली बोळांनाच आपल्या चोरीचा एक महत्वाचा भाग बनवला. कारण मिलिंदला ठाण्यातील एकूण एक गल्ली बोळांची माहिती होती. सावज हेरुन कट रचल्या नुसार सावज सापळा लावलेल्या ठिकाणी येताच तिझ्या गळ्यातील दागिने चोरायचे आणि ज्या महिलेचे दागिने चोरलेत तिला काही कळण्या आतच बाजूच्या गल्ली बोळांतून मिलिंद गायब व्हायचा ही चक्रावून टाकणारी मंगळसूत्र चोरीच्या मोडसमुळे ठाणे पोलिसही चक्रावून गेले होते.
मिलिंदला अटक केली त्याच क्षणी त्याच्याकडून तब्बल पावणे २ लाख रुपयांचे दागिने मिळाले. ठाणे पोलिसांच्या या कारवाईमुळे आता महिलांना अधिक सक्रिय रहावं लागणार आहे. कारण आधी रस्त्याने चालताना समोर किंवा मागून येणाऱ्या गाड्यांकडे महिला लक्ष ठेवून होत्या पण आता आजूबाजूने चालणाऱ्यांकडे ही महिलांना लक्ष ठेवावे लागणारेये नाही तर मिलिंद सारखा एखादा चोराने दागिन्यांवर हात साफ केलाच म्हणून समजा...
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.