ठाणे महापालिकेचा नागरिकांच्या जीवाशी खेळ, अधिकाऱ्यांनीच दिली ही कबुली

ठाणे महापालिकेचा नागरिकांच्या जीवाशी  खेळ, अधिकाऱ्यांनीच दिली ही कबुली

स्मार्ट सीटी अशी ख्याती असलेल्या ठाण्यातल्या अनेक भागात गढूळ पाणी येत आहे. त्यामुळे नागरिकांना आजारांचा सामना करावा लगातोय.

  • Share this:

अजित मांढरे, मुंबई 24 जुलै : ठाणे महानगरपालिका ठाणेकरांच्या जीवाशी खेळतेये याची कबूली थेट आता नगर अभियंत्यांनीच दिलीये. जे काम मे महिन्यात व्हायला पाहिजे होते ते अजून झालं नाहीये त्यामुळे ठाणेकरांना गढूळ पाणी प्यावं लागतं अशी कबूल ठाणे मनपाचे नगर अभियंता रविंद्र खडताळे यांनी जाहीरपणे दिलीये.  ठण्यातील वागळे पट्ट्यात तसेच विशेष करून ज्ञानेश्वर नगर परिसरात गढूळ पाणी पिऊन नागरिकांना अनेक साथीचे आजार झाले असून पालिकेच्या या ढिसाळ कारभाराविरोधात ठाणेकरांनी आंदोलन केले होते पण तरीही ठाणेकरांच्या नळात गढूळ पाणीच येतय.

काँग्रेसला अच्छे दिन आणण्यासाठी बाळासाहेब थोरात मैदानात, अशी आहे रणनीती

शेवटी आज मनसेच्या वतीने देखील गढूळ पाण्याचा मुद्दा उपस्थित करण्यात आला या विरोधात त्यांनी थेट पालिका मुख्यालयातच घुसून पाणी पुरवठा विभागात ठिय्या आंदोलन केले. यावेळेस नगर अभियंता रविंद्र खडताळे यांनी ही धक्कादायक कबूली दिलीये.

स्मार्ट ठाण्यात ठाणेकरांना गढूळ पाणी प्यावे लागत असून ही  गंभीर समस्या ज्यांच्या समोर मांडायची आहे ते पाणी खात्याचे उपअभियंता अर्जुन अहिरे सुट्टीवर असल्याने कार्यकर्ते चांगलेच संतापले. त्यांनी थेट आयुक्त कार्यालयात आंदोलन करण्याचा इशारा दिला. मात्र स्वतः शहर अभियंता पाणी पुरवठा विभागात आल्याने कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे समस्या मांडली.

VIDEO: दहशत पसरवण्यासाठी भरदिवसा नेमाबजाला तीन तरुणांची बेदम मारहाण

Loading...

वागळे, पचपाखडी, वर्तक नगर, म्हाडा, लोकमान्य नगर, ज्ञानेश्वर नगर अशा अनेक भागात गढूळ पाण्याचा पाणीपुरवठा होत असल्याचं कार्यकर्त्यांनी यावेळी शहर अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिलं. मनसे कार्यकर्त्यांचा संताप पाहताच शहर अभियंता रवींद्र खडताळे यांनी मात्र येत्या तीन दिवसांत ही समस्या सोडवण्याचे आश्वासन दिले.  चार वर्षांपासू ज्या कनेक्शनमधून रॉ वॉटरचा पाणी पुरवठा होतो ते कनेक्शन बदलण्याची कार्यवाही सुरू करण्यात आलीये वास्तविक हे काम मे महिन्यात होणं गरजेचं होतं असंही यावेळी त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात नवं समीकरण, प्रकाश आंबेडकरांची साथ सोडलेल्या नेत्यांना राजू शेट्टी सोबत घेणार?

मात्र या सर्व प्रक्रियेला एक आठवडा लागणार असल्याने तोपर्यंत ज्या ठिकाणी शक्य असेल तिथे पिण्याच्या पाण्यासाठी टँकर पाठवण्याचे आदेश रवींद्र खडताळे यांनी दिले आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 24, 2019 03:10 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...