Elec-widget

मुंब्रा बायपास बनलाय 'मृत्यूचा बायपास'; दोन महिन्यात 15 अपघात

मुंब्रा बायपास बनलाय 'मृत्यूचा बायपास'; दोन महिन्यात 15 अपघात

अपघात होऊ नये यासाठी कोणत्याच उपाययोजना न केल्याने, मुंब्रा बायपासवर दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढू लागलीये.

  • Share this:

अजित मांढरे, ठाणे, 31 ऑक्टोबर : डागडुजीनंतर नुकताच वाहतूकीकरता खुला झालेला मुंब्रा बायपास मृत्यूचा सापळा बनलाय. अवघ्या 2 महिन्यात या मुंब्रा बायपासवर 15 पेक्षा जास्त अपघात झालेत. यात आतापर्यंत 5 जणांचा मृत्यू झालाय. कमकुवत झालेले उड्डाणपूल, खचलेले रस्ते, धोकादायक झालेली दरड दुरुस्त करुन मुंब्रा बायपास चकाचक केला गेला. मात्र, अपघात होऊ नये यासाठी कोणत्याच उपाययोजना न केल्याने, या बायपासवर दिवसेंदिवस अपघातांची संख्या वाढू लागलीये.

मुंब्रा बायपासचे मोठ्या थाटा-माटात उद्घाटन झाले. या बायपासची डागडुजी आमच्याच नेत्यांमुळे झाली असे श्रेयाचे फलकही झळकले. मात्र, आता हाच बायपास 'मृत्यूचा बायपास' बनलाय. फक्त दोन महिने झालेत डागडुजीनंतर हा मुंब्रा बायपास सुरु होऊन, मात्र या बायपासवर अपघात होऊ नये याकरता कोणतीच खबरदारी न घेतल्याने या बायपासवर दोन महिन्यातच 15 पेक्षा जास्त छोटे-मोठे अपघात झालेत. ज्यात 5 जणांचा मृत्यू झालाय.

बायपासवर सुरक्षा उपाय योजना कराव्यात अन्यथा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होईल, असा वारंवार सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्र व्यवहार करुनही सावर्जनिक बांधकाम विभाग काहीच करत नाहीये असं ठाणे वाहतूक पोलीसांचे म्हणणे आहे.

रस्त्यांवरील अपघात रोखण्यासाठी राज्य सरकारच्यावतीने वेळोवेळी अनेक कार्यक्रम राबविले जातात. मात्र इथे राज्य सरकारच्याच गलथान कारभारामुळे अनेकांचे बळी जाताहेत. यामुळे आता सरकारवरच निष्काळजीपणा आणि सदोष मनुष्य वधाचा गुन्हा दाखल करा, अशी मागणी आता जोर धरु लागलीये.

मुंब्रा बायपासवर या उपाययोजनांचा अभाव...

Loading...

1 - संपुर्ण मुंब्रा बायपासवर निम्यापेक्षा जास्त रस्त्यावर पथदिवेच नाहीयेत.

2 - रात्रीच्या वेळेस प्रवास करताना रस्त्यांच्याकडेला सुरक्षा म्हणून रेडीयम पट्टे नाहीत.

3 - वाहनांची वेग मर्यादा किती असावी ते फलक नाहीत.

4 - या बायपासवर अपघाती वळणे खुप आहेत, त्या संबंधीचे सुचना फलक नाहीत.

5 - आणि सर्वात महत्वाचे म्हणजे बायपासवर कुठेच सिसिटिव्ही कॅमेरे नाहीत.

 नक्षली हल्ला- पत्रकारासमोर उभा ठाकलेला मृत्यू, आईसाठी रेकॉर्ड केला भावूक VIDEO

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 31, 2018 09:08 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...