मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मुंब्रा खाडीत ज्वेलर्सचा मृतदेह आढळल्याने खळबळ; हत्या की आत्महत्या?

मुंब्रा खाडीत ज्वेलर्सचा मृतदेह आढळल्याने खळबळ; हत्या की आत्महत्या?

नवीन पनवेल परिसरात एका 60 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. (File Photo)

नवीन पनवेल परिसरात एका 60 वर्षीय वृद्धाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे. (File Photo)

Thane jeweller found dead in Mumbra creek: मुंब्रा खाडीत ठाण्यातील बेपत्ता असलेल्या ज्वेलर्सचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.

ठाणे, 21 ऑगस्ट : ठाण्यातील बेपत्ता असलेल्या ज्वेलर्सचा मृतदेह (Thane Missing jewellers found dead) आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. या ज्वेलर्सचं नाव भरत जैन (Bharat Jain) असल्याची माहिती समोर येत आहे. ते 15 ऑगस्टपासून बेपत्ता होते आणि त्यासंदर्भात त्यांच्या पत्नीने ठाण्यातील नौपाडा पोलीस स्टेशन (Naupada Police Station)मध्ये बेपत्ता असल्याची तक्रारही नोंदवली होती. मात्र, शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास मुंब्रा खाडीत मृतदेह आढळू आला आहे. ठाण्यातील मुंब्रा खाडी परिसरात असलेल्या गणेश विसर्जन घाट परिसरात एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला आहे. हा मृतदेह म्हणजे ज्वेलर्स भरत जैन यांचाच असल्याचं बोललं जात आहे. त्यांनी आत्महत्या केली की हत्या झाली आहे याबाबत गूढ कायम आहे. मृतदेह हा शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यावर मृत्यूचं कारण समोर येईल. Social Media मध्ये स्टंटबाजी पडली महागात; चौघांना नागपूर पोलिसांनी ठोकल्या बेड्या मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, ठाण्यातील नौपाडा परिसरात राहणारे भरत जैन हे 15 ऑगस्ट पासून बेपत्ता झाले होते. आपल्या ज्वेलर्समधून निघालेले भरत हे घरी पोहोचलेच नव्हते. त्यानंतर त्यांच्या पत्नीने पोलिसांत तक्रार दाखल केली होती. मात्र, आता त्यांचा मृतदेह आढळून आल्याने एकच खळबळ उडाली आहे. मनसुख हिरन यांचाही मृतदेह याच ठिकाणी आढळला होता मुंबईत आढळून आलेल्या स्फोटकांच्या कारचे मालक मनसुख हिरन यांचाही मृतदेह काही दिवसांपूर्वी याच ठिकाणी आढळून आला होता. मनसुख हिरन यांचा मृतदेह आढळून आल्यावर काही दिवसांनी त्याच परिसरात आणखी एका व्यक्तीचा मृतदेह आढळून आला होता.
First published:

Tags: Crime, Thane

पुढील बातम्या