12 वाजून 56 मिनिटांनी ठाणे लोकलमध्ये अचानक घुसले NSGचे जवान, वाचा नेमकं काय घडलं

12 वाजून 56 मिनिटांनी ठाणे लोकलमध्ये अचानक घुसले NSGचे जवान, वाचा नेमकं काय घडलं

प्लॅटफॉर्मवर अचानक राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (NSG) शेकडो जवान रेल्वे स्थानकात दाखल झाले आणि ट्रेनच्या तीन डब्ब्यांमध्ये शिरले.

  • Share this:

मुंबई, 09 मार्च : मुंबई लोकल म्हंटल की प्रवाशांची प्रचंड गर्दी आणि तुबंड भरलेले प्लॅटफॉर्म डोळ्यासमोर येतात. मात्र ठाणे स्थानकात दुपारी 12 वाजून 56 मिनिटांनी एक वेगळाच प्रकार पाहायला मिळाला. ठाण्याहून छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला जाणाऱ्या ट्रेनमध्ये प्रवाशी चढलेच नाही. कारण प्लॅटफॉर्मवर अचानक राष्ट्रीय सुरक्षा दलाचे (NSG) शेकडो जवान रेल्वे स्थानकात दाखल झाले आणि ट्रेनच्या तीन डब्ब्यांमध्ये शिरले. हा सगळा प्रकार ठाणे स्थानकाच्या एक क्रमांकाच्या प्लॅटफॉर्मवर घडला. सीएसटीएमला जाणाऱ्या प्रवाशांची गर्दी असताना, यात एनएसजीचे प्रवासी ट्रेनमध्ये चढल्याने खळबल माजली. मात्र सुरक्षा दलाचे हे मॉक ड्रील असल्याचे कळल्यानंतर प्रवासी ट्रेनमध्ये चढले.

ठाणे स्थानकात एनएसजी कमांडोजचा हा सराव 28 फेब्रुवारी रोजी पार पडला. मात्र त्याचे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या व्हायरल होत असलेल्या फोटोमध्ये हातात बंदूक घेऊन लोकलच्या डब्ब्यात बसलेले दिसत आहेत.

वाचा-VIDEO : जिगरबाज संयाजी शिंदे! डोंगरावर लागलेली आग विझवताना सांगितला थरारक अनुभव

वाचा-राणा कपूर यांच्या अडचणीत वाढ, वरळी व लोअर परेल येथे CBI ची छापेमारी

लोकसत्ताने दिलेल्या वृत्तानुसार, ठाण्यावरून निघालेली ही ट्रेन 1 वाजून 12 मिनिटांनी कांजूरमार्ग स्टेशनवर पोहचली. त्यानंतर कमांडोची दुसरी तुकडी ट्रेनमध्ये चढली. यावेळी ट्रेनमध्ये या राखीव डब्ब्यांमध्ये इतर कोणी चढू नये म्हणून सुरक्षा तैनात करण्यात आली होती. ही ट्रेन सीएसटीएमला पोहचल्यानंतर हा सराव पूर्ण झाला.

वाचा-कोरोनाचा झाला धंदा, पैसे कमवण्यासाठी पुण्यात चोरले 35 हजारांचे मास्क

वाचा-मॉर्निंग वॉक करणाऱ्या तरुणाला कारनं चिरडलं, पाहा अपघाताचा थरारक VIDEO

दरम्यान रेल्वे अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार या मॉक ड्रीलसाठी तीन डब्बे रिकामे ठेवण्यात आले होते. यावेळी तब्बल 100 एनएसजीच्या जवानांची मॉक ड्रील केले. मॉक ड्रील सुरू असल्यामुळं या डब्ब्यांमध्ये प्रवाशांना प्रवास करण्यास मनाई होती.

First published: March 9, 2020, 1:11 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading