News18 Lokmat

लहान मुलीशी अश्लील वर्तन करणाऱ्याला मनसेनं थेट पत्रकार परिषद घेऊन दिला चोप

एका ५३ वर्षी पुरुषाने लहान मुलीसमोर अश्लील चाळे केल्याचा व्हिडिओ जारी करुन पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यात त्या पुरुषाला थेट पत्रकार परिषदेतच चोप दिलाय.

News18 Lokmat | Updated On: Oct 8, 2018 12:11 PM IST

लहान मुलीशी अश्लील वर्तन करणाऱ्याला मनसेनं थेट पत्रकार परिषद घेऊन दिला चोप

अजित मांढरे, प्रतिनिधी

ठाणे, 08 ऑक्टोबर : एका ५३ वर्षी पुरुषाने लहान मुलीसमोर अश्लील चाळे केल्याचा व्हिडिओ जारी करुन पत्रकार परिषदेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने ठाण्यात त्या पुरुषाला थेट पत्रकार परिषदेतच चोप दिलाय.  त्यामुळे ठाण्यातील पोलीस करताहेत काय असा प्रश्न ही पत्रकार परिषद घेउन मनसेनं उपस्थित केलाय.

ठाण्यात लहान मुली किती सुरक्षित आहेत हा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. ठाण्यातील वागळे स्टेट येथील रतनबाई कम्पाउंड डिसोजावाडी येथे एक लहान मुलगी खेळत असताना एक नराधम पुरुष तिथे येतो आणि मुलींशी गप्पा मारतो. या बहाण्याने तो आपले गुप्तांत काढून त्या लहान मुलीला आपले गुप्तांग दाखवतो. बराच वेळ त्याचा हा प्रकार सुरू असतो.

थोड्यावेळाने तो नराधम पुरुष त्या मुलीला जबरदस्तीने जवळ घेतो. हा सर्व प्रकार अरविंद चौगुले नावाच्या एका तरुणाने त्याच्या मोबाईलमध्ये रेकार्ड केला होता आणि नंतर हा व्हिडिओ मनसेचे ठाणे जिल्हा अविनाश जाधव यांच्यापर्यंत पोहोचला असता त्यांनी त्या नराधमाला शोधून काढले आणि पत्रकार परीषद घेऊन थेट पत्रकार परीषदेतच मनसेनं त्या नराधमला हजर करत पत्रकार परीषदेतच जगदीश राॅय या नराधमाला चोप दिला.

या विकृतावर कठोर कारवाई करण्याची मागणी स्थानिकांकडून केली जातेय. दरम्यान, पोलिसांना या नराधमाला ताब्यात घेतल्यानंतर थातूरमातूर कारवाई करुन त्याला सोडून दिलं असही सांगितलं जातंय. पण अशा नराधमांच्या वेळीच मुसक्या आवळणं महत्त्वाचं आहे. नाहीतर यांची मूजोरी वाढेल. त्यामुळे याच्यावर कठोर कारवाई करा अशी मागणी ठाणेकरांकडून करण्यात आली आहे.

Loading...

VIDEO: डॉक्टर तरुणीचा गळा कापणारा 'तो' मांजा अजूनही तिथेच!

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 8, 2018 12:11 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...