ठाणे ते डोंबिवली रेल्वे प्रवास ठरला मृत्यूचा सापळा, दरवर्षी 700पेक्षा जास्त मृत्यू

ठाणे ते डोंबिवली रेल्वे प्रवास ठरला मृत्यूचा सापळा, दरवर्षी 700पेक्षा जास्त मृत्यू

डोंबिवली ते ठाणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धडकी भरवणारी माहिती आहे. अपघाताची नेमकी कारणं शोधण्यात आली तरी त्यावर उपाययोजना होत नाहीत.

  • Share this:

अजित मांढरे, ठाणे 26 जुलै : मध्ये रेल्वे वरील सर्वांत गर्दीचे ठिकाण म्हणून ठाणे रेल्वे स्थानक ओळखले जाते. तर डोंबिवली हे दुसरं तसचं गर्दीचं स्थानक आहे. मात्र या दोन स्थानकांदरम्यान प्रवास हा मृत्यूचा सापळा ठरलाय. या 25 मिनिटांच्या प्रवासात या मार्गावर दररोज तीन अपघात होतात आणि त्यात किमान 2 प्रवाशांचा मृत्यू होतो अशी माहिती RTIमध्ये उघड झालीय.

डोंबिवली रेल्वे स्थानकात सोमवार ते शनिवार अशी सहा दिवस  प्रवाशांची तोबा गर्दी असते त्यात जरा ट्रेनला उशीर झाला की आणीबाणीची परिस्थिती निर्माण होते. मात्र यामुळे नाहक बळी जातो तो रेल्वे प्रवशांचा. रोज रेल्वेनं प्रवास करत कामावर जाणारी आपली व्यक्ती घरी सुखरुप परत येईल का? हा प्रश्न प्रवाशांच्या कुटूंबीयांना पडतो. आणि आता तर माहिती अधिकारातून समोर आलेली माहिती धक्कादायक आहे.

...म्हणून भाजपऐवजी शिवसेनेत प्रवेश केला, सचिन अहिरांचा नवा खुलासा

डोंबिवली ते ठाणे प्रवास करणाऱ्या प्रवाशांना धडकी भरवणारी माहिती आहे. सामाजिक कार्यकर्ते सिद्देश देसाई यांना माहिती अधिकारात प्राप्त झालेल्या माहिती नुसार रोज किमान 2 प्रवाशांचा डोंबिवली ते ठाणे प्रवास करताना धावत्या लोकल मधून पडून मृत्यू होतो असं स्पष्ट होतंय.

ही आहेत अपघाताची कारणं

ठाणे ते दिवा रेल्वे प्रवास करताना जानेवारी 2018 ते मे 2019 पर्यंत 257 प्रवासी धावत्या लोकल मधून पडून जखमी झालेत.

ठाणे ते दिवा रेल्वे प्रवास करताना जानेवारी 2018 ते मे 2019 पर्यंत 279 प्रवासी धावत्या लोकल मधून पडून मृत्यूमुखी पडलेत.

खरं तर गेली कित्येक वर्षे प्रवासी संघटना, रेल्वे प्रशासन आणि रेल्वे पोलीस यांच्या मार्फत डोंबिवली ते ठाणे दरम्यान अपघात का होतात याची कारणे शोधून ब्लॅक स्पॉट शोधून काढलेत.

डोंबिवली ते कोपर दरम्यान जुना लोखंडी पुल आणि धावत्या रेल्वेत कमी अंतर असल्याने तिथे अपघात होतात

कोपर ते दिवा दरम्यान भोपर नाल्यावर ट्रॅकवरुन चालणारे नागरीक अपघातग्रस्त होतात.

काँग्रेस, राष्ट्रवादीला बसणार मोठा धक्का, हे तीन मोठे नेते भाजपच्या गळाला..

कोपर ते दिवा दरम्यान शंकरा मंदीर जवळ धावत्या लोकल मधील प्रवाशांच्या हातावर काठीने फटके मारल्याने अनेक प्रवाशांचा मृत्यू झालाय.  दिवा ते मुंब्रा दरम्यान वळणाचा ट्रॅक असल्याने गर्दीच्या वेळेस रेल्वेच्या दरवाज्यात लटकणारे प्रवासी या वळणावर गाडी येतात झटका लागतो आणि तोल जावून प्रवासी पडतात.कळवा रेल्वे स्थानकावरील फुट ओव्हर ब्रीजचा वापर न करता प्रवासी लोकं थेट रेल्वे रुळ क्रॉस करतात यामुळे अनेक प्रवाशांचा मृत्यू होतो.

नरेंद्र मोदींच्या सर्वात मोठ्या विरोधकाची भेट घेणार राज ठाकरे, हे आहे खास कारण

ही कारणं जशी प्रवाशांच्या अपघात आणि मृत्यूला कारणीभूत आहेत तसच उशीरा धावणारी लोकल सेवा हेही एक मुख्य कारण आहे. एखाद्या लोकलला थोडा जरी उशीर झाला तरी गर्दीत प्रचंड वाढ होते आणि लोक लटकून प्रवास करतात. त्यामुळं प्रवाशांचा अपघात होतो. त्याचबरोबर मानवी चुकाही अपघाताला कारणीभूत आहेत. प्रवाशांनीही काळजी घेतली तर अपघाताचं प्रमाण कमी होऊ शकतं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 26, 2019 06:25 PM IST

ताज्या बातम्या