Thane News : मोबाईल चोरांमुळं आणखी एका तरुणीचा मृत्यू, 24 तासांत आरोपी अटकेत

Thane News : मोबाईल चोरांमुळं आणखी एका तरुणीचा मृत्यू, 24 तासांत आरोपी अटकेत

महिलेनं हातातला मोबाईल सोडला नाही तर चोरानं मोबाईल हिसकावण्यासाठी झटका दिला, त्यात ती महिला धावत्या रिक्षातून खाली पडली. त्यामुळं महिला प्रचंड जखमी झाली.

  • Share this:

ठाणे, 11 जून : काही दिवसांपूर्वीच कळवा रेल्वे स्थानकावर महिलांच्या डब्यातून मोबाईल चोरांनी मोबाईल हिसकावल्यानं (Mobile snaching) पडून एका महिलेनं जीव गमावला होता. ही घटना ताजी असतानाच ठाण्यात (Thane) अशीच आणखी एक घटना घडली. यातही एका महिलेनं जीव गमावला (Woman died in Thane) फक्त फकत एवढा होता की, ती रिक्षातून प्रवास करत होती. या प्रकरणी पोलिसांनी लगेचच कारवाई करत आरोपीला 24 तासांच्या आत अटक केली आहे.

(वाचा-शरद पवार-प्रशांत किशोर यांच्या भेटीवर अजित पवारांची प्रतिक्रिया)

ठाणे परिसरात ही घटना घडली आहे. ठाणे परिसरात नौपाडा भागामझ्ये कन्मिला रायसिंग नावाची 27 वर्षीय महिला रिक्षातून प्रवास करत होती. ही महिला रिक्षाच्या कडेला बसलेली होती. तिच्या हातामध्ये मोबाईल होता. रिक्षा रस्त्यावरून जात असतानाच रिक्षाच्या जवळ एक बाईक आली. त्या बाईकवर दोन जण होते. यापैकी मागे बसलेल्या दोघांपैकी एकानं महिलेच्या हातातली मोबाईल हिसकावण्याचा प्रयत्न केला. पण महिलेच्या लगेचच हा प्रकार लक्षात आल्यानं महिलेनं त्याला विरोध केला.

(वाचा-'आम्ही राजकीय नेत्यांना घरी जाऊन लस दिली नाही' BMCचे स्पष्टीकरण)

महिलेनं हातातला मोबाईल सोडला नाही तर चोरानं मोबाईल हिसकावण्यासाठी झटका दिला, त्यात ती महिला धावत्या रिक्षातून खाली पडली. त्यामुळं महिला प्रचंड जखमी झाली. त्यामुळं महिलेला उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं पण त्या दरम्यान महिलेचा मृत्यू झाला आहे. या प्रकरणी पोलिसांनी लगेचच कारवाई केली. महिलेच्या मृत्यूला जबाबदार ठरलेल्या दोघांना नौपाडा पोलिसांनी 24 तासांत अटक केली.

अल्केश उर्फ परवेझ अन्सारी (20) आणि सोहेल अन्सारी (18) अशी आरोपींची नावं आहेत. ते दोघंही भिवंडीतील रहिवासी आहे. हे दोघंही सराईत मोबाईल चोर असून त्यांच्या विरोधात कोनगाव व नारपोली पोलीस ठाण्यातही गुन्हे दाखल आहेत. पोलिसांनी त्यांच्याकडून मृत तरुणीच्या मोबाईलसह इतर तीन मोबाईल, रोकड आणि एक दुचाकी जप्त केली. ठाणे सत्र न्यायालयानं दोघांना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

Published by: News18 Desk
First published: June 11, 2021, 4:24 PM IST

ताज्या बातम्या