Home /News /mumbai /

ठाण्यात फ्लेमिंगोंसाठी अभयारण्य; राज्याकडून रामसर दर्जासाठी प्रस्ताव

ठाण्यात फ्लेमिंगोंसाठी अभयारण्य; राज्याकडून रामसर दर्जासाठी प्रस्ताव

आंतरराष्ट्रीय कांदळवन संवर्धनाच्या दिवशी (International Day for the Conservation of the Mangrove) ‘ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या’ला रामसर दर्जा मिळावा यासाठी राज्याचा प्रस्ताव पाठविण्याची घोषणा करण्यात आली. गोराई- दहिसरमध्येही Mangrove Park होणार आहे.

पुढे वाचा ...
    मुंबई, 26 जुलै:  ठाण्याच्या खाडीत (Thane creek) सर्वाधिक स्थलांतरित पक्ष्यांचं आगमन होतं. फ्लेमिंगोंसाठी हक्काची पाणथळ जागा कायम राहावी यासाठी ठाण्याची खाडी हे फ्लेमिंगो अभयारण्य (Flamingo Sanctuary Thane creek) म्हणून कायम राहावं आणि  ‘ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्या’स (Thane news) रामसर दर्जा (ramsar convention)मिळावा यासाठी राज्याचा प्रस्ताव पाठविण्याची घोषणा करण्यात आली आहे. आंतरराष्ट्रीय कांदळवन संवर्धनाच्या दिवशी (International Day for the Conservation of the Mangrove) कांदळवन संवर्धन आणि पुनरुज्जीवनासाठी राज्य शासनाने रोड मॅप सादर केला. ‘माझी वसुंधरा’ उपक्रमाच्या अंतर्गत चौथ्या टाऊनहॉलमध्ये हे जाहीर करण्यात आले. कांदळवन कक्षाचे अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक, विरेंद्र तिवारी यांनी रामसर ठाणे फ्लेमिंगो अभयारण्याविषयी घोषणा केली आणि प्रस्ताव पाठवल्याची माहिती दिली. ठाणे खाडी फ्लेमिंगो अभयारण्याचे रामसर साईटनुसार असलेले आंतरराष्ट्रीय महत्व पाहता राज्याच्या कांदळवन कक्षाकडून हा प्रस्ताव पाठविण्यात आला असल्याने लवकरच मुंबई महानगर प्रदेशासाठी पहिली रामसर साईट मिळू शकते. Cloudburst: ढगफुटी म्हणजे नेमकं काय? आभाळ कसं फाटतं, जाणून घ्या... क्लायएमेट रिझिलिएंट महाराष्ट्र टाऊनहॉलमध्ये कांदळवन कक्षाचे (Mangrove) अतिरिक्त प्रधान मुख्य वन संरक्षक, विरेंद्र तिवारी यांनी या संदर्भात घोषणा केली. राज्याच्या पर्यावरण आणि वातावरण बदल मंत्रालयाच्या ‘माझी वसुंधरा’ उपक्रमासोबत याचे आयोजन ‘क्लायमेट व्हॉईसेस’ (पर्पज, असर आणि क्लायमेट ट्रेन्ड यांचा संयुक्त उपक्रम),  यांनी केले. ‘वातावरण फाऊंडेशन’ या NGO ने याचं संयोजन केलं. 26 जुलै हा आंतरराष्ट्रीय कांदळवन संवर्धन दिन म्हणून ओळखला जातो. तिवारी म्हणाले, “ ठाणे खाडीला रामसर दर्जा द्यावा याबाबत प्रस्ताव पाठविण्यात आला असून, राज्याच्या पर्यावरण आणि वातावरण मंत्रालयासोबत त्यावर काम सुरु आहे. या प्रस्तावावर राज्याच्या पर्यावरण मंत्र्यांच्या अख्यत्यारितील ‘राज्य पाणथळ जागा प्राधिकरणा’ची मंजुरी अपेक्षित आहे. त्यानंतर हा प्रस्ताव केंद्र शासनास सादर केला जाईल. ही संपूर्ण प्रक्रिया जलदगतीने व्हावी यासाठी आम्ही पर्यावरण मंत्रालयासोबत कार्यरत आहोत. ” रामसर दर्जा म्हणजे काय? 1971 साली इराणमधील रामसर शहरात भरलेल्या ‘कन्वेन्शन ऑन वेटलँड्स’ ह्या जागतिक परिषदेला ‘रामसर परिषद’ मानले जाते. ह्याच परिषदेत जगातील महत्त्वपूर्ण पाणथळ जागांचे संवर्धन व त्यांच्या पर्यावरणपूरक वापराचे निर्णय घेण्यात आले. Explainer: मुंबईतल्या पावसाबद्दल IMD चा अंदाज कसा चुकला? हा पाऊस असामान्य आहे का ह्या आंतरराष्ट्रीय परिषदेतील चर्चेद्वारा महत्त्वाच्या पाणथळ जागांच्या संवर्धनासाठी प्रत्येक देशाने राष्ट्रीय स्तरावर करावयाच्या कृतींचा आराखडा तयार करण्यात आला. ह्या कृती आराखड्यात मान्य केल्याप्रमाणे प्रत्येक सहभागी राष्ट्राने आपल्या देशातील जागतिक दृष्टीने महत्त्वपूर्ण पाणथळ जागा शोधून त्यांना ‘रामसर स्थळ’ म्हणून घोषित करावे असे ठरले. अशा स्थळांचं त्या देशाने योग्य प्रकारे संवर्धन करावे तसेच तेथील जैवविविधतेचा पर्यावरणपूरक वापर करावा असे स्वीकारण्यात आलं. पाणथळ जागांचं सीमांकन राज्याच्या पर्यावरण आणि वातावरण बदल विभागाच्या प्रधान सचिव मनिषा पाटणकर-म्हैसकर म्हणाल्या, “राज्यभरातील किनारपट्टी आणि अंतर्गत भागातील यादीबाहेर असलेल्या पाणथळ जागांचा नव्याने आढावा, त्यांच्या नोंदी, सीमांकन करण्यासाठी एका कृती दलाचे गठन करण्यात येईल. राज्यभरातील जास्तीत जास्त पाणथळ जागांच्या (जरी त्या यादीबाहेर असल्या तरी ) संरक्षणाचा प्रयत्न आहे. यादीबाहेर असलेल्या पाणथळ जागांच्या नव्याने नोंदी आणि सीमांकनासाठी पर्यावरण मंत्री सर्व जिल्ह्याधिकाऱ्यांना भेटण्याचे नियोजन करत आहेत. हे सर्व लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी कृती दलाचे गठन केले जाईल.” मुंबईभोवती पाचूंचा हार राज्यात आलेल्या पूर परिस्थितीकडे पाहता पाणथळ जागा आणि कांदळवनांचे महत्व दिसून येतं. म्हैसकर म्हणाल्या, "मुंबई आणि मुंबई महानगर प्रदेशाभोवती ‘पाचूंचा हार’ विकसित करण्यासाठी ज्या ज्या ठिकाणी शक्य असेल त्या ठिकाणी कांदळवनांचे रोपण करण्यात येईल. त्यामुळे केवळ पुरापासूनच नाही, तर पाण्याशी निगडीत तीव्र समस्यापासूनदेखील संरक्षण होईल." गोराई आणि दहिसरलाही Mangrove Park मुंबई आणि नवी मुंबई क्षेत्रातील अतिक्रमणांपासून कांदळवनांच्या संरक्षणासाठी आत्तापर्यंत 3.5 किमीचे कुंपण घालण्यात आले आहे. ‘त्याबरोबरच भविष्यकाळातील संरक्षणासाठी सीसीटीव्ही आणि ड्रोनच्याआधारे लक्ष्य ठेवण्याचा अभ्यास सुरू करण्यात आला आहे असे, तिवारी म्हणाले. वासामुळे तोंड फिरवू नका; आरोग्यसाठी फायदेशीर आहे शेपू; वजनही होईल कमी गोराई आणि दहिसर येथे पुढील दोन वर्षात मॅन्ग्रूव्ह पार्क उभारण्यात येणार आहेत. ‘गोराई पार्कबाबत सर्व परवानग्या मिळाल्याअसून वर्क ऑर्डर देण्यात आली असून दोन वर्षात हा पार्क तयार होईल. दहिसर पार्कबाबत सध्या काम सुरू आहे, असं तिवारी म्हणाले. पर्यावरण कायदा 1976 नुसार वन विभागाला सशक्त करण्यासाठी केंद्रीय वने आणि पर्यावरण मंत्रालयास प्रस्ताव पाठविण्यात आला आहे. यामुळे सर्व प्रकारच्या कांदळवन आणि पाणथळ जागांच्या विध्वसांच्या घटनांमध्ये वन विभागाच्या अधिकाऱ्यांना स्वत:च्या अधिकारात त्वरीत कारवाई येईल.
    First published:

    Tags: Thane

    पुढील बातम्या